ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गावठी मोहा दारुची हातभट्टीवर पोलिसांची धाड

एकूण १ लाख ३६ हजारांवर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन पुलगाव ची कारवाई आज दिनांक 10/07/2024 रोजी मौजा शहापुर शेत शिवारातील हरीभाऊ दाभेकर यांच्या शेतामधे असलेल्या विहीरीवर दोन ईसम गावठी मोहा दारु ची हातभट्टी लावुन गावठी मोहा दारु गाळीत आहे अशा माहीती वरुन दोन पंचासमक्ष पो.स्टॉफ चे मदतीने नमुद आरोपीतानवर प्रो.रेड घातला असता नमुद आरोपी नामे 1) वृक्षय मारोतराव शिवरकार वय 32 वर्ष रा. विटाळा ता, धामनगाव जिल्हा अमरावती 2)सौरभ सजंय बावने वय 28 वर्ष रा, वल्लभनगर गुंजखेडा. ता.देवळी जि वर्धा हे संगनमताने गावठी मोहा दारुची हातभट्टी लावुन गावठी मोहा दारु गाळीत असतांना रंगेहात मीळुन आले. त्याचे ताब्यातुन व मौक्यावरुन 1)दोन लोखंडी ड्रम मध्ये प्रती ड्रम मधे 100 लिटर प्रमाने एकुन 200 लीटर उकळता मोहा रसायन सडवा प्रति लिटर 100/-रुपये प्रमाणे 20,000 /- रुपये व दोन लोखंडी ड्रम की 2000/रु 2) पाच प्लास्टीक ड्रम मध्ये प्रती ड्राम मधे 200 लिटर प्रमाने एकुन 1000 लीटर कच्चा मोहा रसायन सडवा प्रति लिटर 100/-रुपये प्रमाणे 1,00,000 /- रुपये व पाच प्लास्टीक ड्रम की 5000/रु 3) तीन प़्लॉस्टीक कँन मध्ये 36 लिटर गावठी मोहा दारु प्रती लिटर 150/- रुपये प्रमाणे 5,400/- रुपये व तीन प़्लॉस्टीक कँन की 600/रु 4) दोन जर्मन घमीले किमंत 1000/- रुपये 5) ईतर भट्टी साहीत्य की 2000/ रुपये असा एकुण जुमला किमंत 1,36,000/- रु चा माल मिळुन आल्याने पंचासमक्ष मौक्काजप्ती पंचानामा कार्यवाही करुन आरोपी विरुध्द सदर गुन्हा नोंद केला.

       सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नरुल हसन सा.,अप्पर पोलीस अधिक्षक श्री.सागर कवडे सा.,उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव IPS राहुल चव्हाण सा.पो.नि.श्री राहुल सोनवणे सा.पो.स्टे पुलगाव यांचे मार्गदर्शनात, पोलीस स्टेशन पुलगाव डी.बी पथकाचे पो.हवा.चंद्रशेखर चुटे , अमोल जिन्दे, रविंद्र जुगनाके, यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये