गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बंद गोडाऊन फोडणारी महिला टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून निष्पन्न

अंदाजे 2 लाख 40 हजाराचा माल चोरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

याप्रमाणे आहे कि, मौजा रामनगर येथे राहणारे आकाश ओमप्रकाश मुंदडा यांच्या बंद गोडावून मध्ये दिनांक 25/6/2024 रोजी कोणी तरी अज्ञात व्यक्तीने गोडावून च्या मुख्य दाराचे कडी कोंडा तोडून गोडावून मधील रायन कंपनीचे इलेक्ट्रीक वायर चे 40 बंडल किंमत अंदाजे 2,40,000 रू चे चोरुन नेले याप्रमाणे दिलेल्या तकार वरुन पो.स्टे. रामनगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा समांतर तपास स्था.गु.शा. वर्धा चे प्रॉपर्टी सेल करीत असतांना सदर गुन्हा करण्याची पध्दतीवरून अशा प्रकारे गुन्हा करणारे आरोपी बाबत माहीती घेवून त्यांचे हालचालीवर पाळत ठेवून गोपनीय माहीती संकलीत केली असता अशा प्रकारे गून्हा करणारे महीलांची टोळी सकीय असल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्यावरून सदर टोळीवर बारकाईने निगराणी ठेवून सदर महिलांची टोळी इतवाराबाजार येथे सदर चोरी केलेल वायरचे बंडल विकी करण्याकरीता आले असता गुप्त बातमीदाराचे प्राप्त माहितीवरुन प्रॉपर्टी सेल चे पथक हे महीला पोलीस अंमलदारासह इतवारा बाजारात जावून सदर महीलांच्या टोळीला विचारपुस केली असता सुरवातीस सदर महिलांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. यानंतर सदर महिला आरोपीतांना विश्वासात घेवून सविस्तर विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हयाची केल्याची कबूली दिली. वरुन सदर गुन्हयात त्यांनी मुख्य दरवाजा तोडण्याकरीता वापरलेला एक लोखंडी रॉड, चोरी केलेले राइन कंपनीचे इलेक्ट्रीक्ट वायरचे एकुण 40 बंडल किंमत 2,40,000/- रु. व ज्या झोऱ्यामध्ये सदर बंडल चोरी करुन घेवुन गेले होते असे 5 झोरे जप्त करण्यात आले आहे. याप्रमाणे सदर गुन्हा हा स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेल ने उघडकीस आणला आहे. सदर महिला हया भंगार वेचण्याच्या बहान्याने शहरात फिरुन बंद घरावर पाळत ठेवुन चोरी करण्याच्या सवयीच्या आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री. नूरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक सागर कवडे, पो.नि. गायकवाड यांचे मार्गदर्शना खाली पो.उपनि. सलाम कुरेशी, पो.हवा. नरेंन्द्र पाराशर, म.पो.हवा निलीमा कोहळे नितीन इरकर श्री. संजय नापोशी संघसेन कांबळे, नितीन इटकरे मीथुन जिचकार, चालक पोहवा गजानन दरणे, सायबर सेलचे अनुप कावळे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये