ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चालू आर्थिक वर्षाचा कर भरण्यासाठी नगर परिषदेने सक्ती करु नये

भाजप नेते सूरज हनुमंतेची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सध्या देऊळगांवराजा शहरामध्ये नवीन पाईपलाईनचे काम सुरू आहे. परंतु त्यामुळे शहर वासियांना १ ते दीड महिन्यापासून पाणी पुरवठा न झाल्यामुळे ऐन पावसाळ्यात त्यांचे पाण्यासाठी हाल होत आहे तर महागडे टँकरव्दारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे नागरीकांना न.प.तर्फे टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात यावा

तसेच नवीन नळ कनेक्शन घेण्यासाठी सन २०२४-२५ चा कर अॅडव्हांसमध्ये जमा करणे न.प.च्या कर्मचाऱ्यामार्फत सक्तीचे करण्यात आले आहे. परंतु सध्या पेरणीचे दिवस असून काही लोकांना सदरहू कर अॅडव्हांसमध्ये भरण्याची कुवत नसल्यामुळे त्यांचे पाण्याशिवाय खुप हाल होत आहे. त्यामुळे न.प. कडून अशा प्रकारे

अॅडव्हांसमध्ये कर आकरणी सक्तीची न करता नळ कनेक्शन देण्यात यावे , विशेष बाब म्हणजे या नवीन पाईपसाठी न.प.ने जुने व नवीन बनविलेले रस्ते सुध्दा खोदून काढले आहे. परंतु पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन बराचसा कालावधी होऊनही रस्त्यावरील मातीचे व दगडांचे ढिगार उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे रहदारीस खुप मोठा अडथळा निर्माण होत असून अनेक ठिकाणी छोटे-मोठे अपघात होतांना दिसून येत आहे. या माती व दगडांमुळे वयोवृध्द नागरीकांना रस्त्याने चालणे सुध्दा मुश्किल झाले आहे. आता शाळा सुरु होणार असून विद्यार्थ्यांना रहदारीस रस्ता मोकळा करणे आवश्यक आहे. तसेच या मातीच्या ढिगाऱ्यामुळे पावसाचे पाणी साचून व चिखल होऊन संसर्गजन्य आजार परसण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही.

तरी नगर परिषदेने वरील सर्व मागण्यांबाबत गांभीर्याने विचार करून त्याबाबत योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी अशी मागणी सूरज धर्मराज हनुमंते भा ज प युवा मोर्चा विधानसभा संयोजक मातृतीर्थ सिडखेडराजा मतदासंघ,एड राजू माटे,ओंकार बन्सीले,शहर अध्यक्ष युवा मोर्च देऊळ्गावराजा,विनायक मंडळकर,विठलं निंबाळकर,आदी कार्य कर्त्यानी मुख्याधिकारी यांच्या कडे केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये