Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अग्निशमन दल,108 रुग्णवाहिका व प्रथमोपचार यांचे संयुक्त प्रात्यक्षिक विभागीय कार्यशाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 10.01.2025 रोजी 36वे राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 या अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा व विभागीय कार्यशाळा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानाने अग्निशमन दल,108 रुग्णवाहिका व प्रथमोपचार यांचे संयुक्त प्रात्यक्षिक आज विभागीय कार्यशाळा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सेवाग्राम रोड वर्धा येथे पार पडले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रताप राठोड यंत्र अभियंता व प्रभारी विभाग नियंत्रण हे होते तसेच श्री अनिल अनलेकर उपयंत्र अभियंता, श्री गोविंद उजवणे विभागीय वाहतूक अधिकारी हे उपस्थित होते.

       तसेच 108 रुग्णवाहिका सेवेचे डॉ.सचिन खोंड सर, मेडिकल ऑफिसर जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच डॉ. रवी जाधव आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी, डॉ. अमोल चापले, डॉ. सुबोध कुरलुके, श्री पवन भगत आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी अग्निशमन दलाच्या वतीने श्री गौरव शेगावकर फायरमन त्याचप्रमाणे मयूर सोनवणे फायरमन, सिद्धार्थ मरकवडे फायरमन,आधी उपस्थित होते.

   सदर कार्यक्रमात 108 रुग्णवाहिका टीमने उपस्थित मान्यवर तसेच उपस्थित चालक व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांना प्रात्यक्षिक करून दाखवले. एखाद्या व्यक्तीस जर अचानक अटॅक आला तर त्यावेळेस सीपीआर कसा द्यावा त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यास त्याला कशा प्रकारे सहाय्य व हाताळणी करावी याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवले.

     अग्नीशमन च्या टीमने उपस्थिति सर्वांना अनावधानाने आग लागल्यास त्यावर कशाप्रकारे नियंत्रण करावे याबद्दल प्रात्यक्षिक करून दाखवले.

   या कार्यक्रमाच्या वेळी डॉ. खोंड सर तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री अनासने साहेब व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रताप राठोड सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 सदर कार्यक्रम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती मेढे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मोवानी कवळे मॅडम, समोवानी श्री पखान सर, श्री ढोबळे सर व त्याचप्रमाणे चालक यांनी पार पाडला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये