Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागभीड नगर परिक्षेत्रात नव्याने पाणी पुरवठा योजनेचे तीन-तेरा

पाणी पुरवठा करणारी विहिरच कोरडी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड नगर परिक्षेत्रात नव्याने मंजूर करण्यात आलेल्या घोडा झरि येथील पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण असून पाणी पुरवठा करणारी विहीराच कोरडी असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नागभीड नगर परिषद क्षेत्रात नगर विकास खात्याकडून पाणी पुरवठा योजना मंजूर करून ती कार्यान्वित करण्यात आली असून अनेक कारणांनी ती रखडली आहे. ज्या ठिकाणी पाणी पुरवठा करणारी विहीर बांधण्यात आली त्या ठिकाणी पाणी पुरवठा होणार आहे तो व्हॉल्व खुला असून विद्युत पुरवठा झाला नाही. नगर परिषद क्षेत्रात असलेल्या अनेक ठिकाणी/गावात पाणी पुरवठा होणारे पाईप लाईन अजून पर्यंत टाकलेले नाहीत आणि काही ठिकाणी टाकले आहेत त्यात पाणी पुरवठा सुरू न झाल्याने कचरा/माती पडलेली आहेत असे चित्र दिसून येत आहे. पाणी साठवून ठेवणारी पाण्याची टाकी साठविण्यासाठी चातकासारखी वाट पाहत असून नियोजन शून्य कारभारामुळे नगर परिषद क्षेत्रात पाणी मिळेल हे दुरापास्त झाले आहे.

प्रादेशिक तपाल पाणी पुरवठा योजनेमुळे नागभीड शहराची पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे मात्र त्यालाही वेळोवेळी ग्रहण लागत असल्याने नवीन पाणी पुरवठा योजनेकडे नगर वाशियांचे लक्ष लागून राहिले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये