ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे आंदोलन

पूर्ततेसाठी जिल्हयातील ऑटोरिक्षा चालकांचा एकदिवसीय धरणे आंदोलन

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने ऑटो रिक्षा चालकांच्या विविध मागण्याची पुर्तता करण्याकरिता जिल्हाधिकारी, चंद्रपूर व जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन सादर केले. दि. २४/०५/२०२४ रोजी ऑटोसंघटनेचे सर्व पदाधिकारी जिल्हाधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन सादर केले. नव्याने ऑटोरिक्षा पासिंग करिता फिटनेस फाईल प्रती दिवस ५०रु आकारणात आलेला आहे. बराचस्या ऑटोरिक्षा चालक काही कारणास्तव पासिंग करू शकले नाही. नव्याने प्रती दिवस ५० रु फिटनेस फाईन आकारल्यामुळे बरेचसे ऑटोरिक्षा चालकांना ऑटोरिक्षा पासिंग करतांना भुर्दंड बसत आहे. त्यामुळे राज्य शासनाने योग्य निर्णय घेवून पहिले जसे होते तसे तसेच ठेवण्याकरिता चंद्रपूर जिल्हयातील ऑटोरिक्षा चालकांचा एकदिवसीय धरणे आंदोलन दिनांक १३.०६.२०२४ रोजी गुरूवारला दुपारी ११:०० ते ०५:०० वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

तरी चंद्रपूर जिल्हयातील सर्व ऑटोरिक्षा चालकमालकांनी या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन ऑटोरिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष श्री. मधुकर राऊत, उपाध्यक्ष श्री. जाकिर शेख, श्री. जहिर शेख, जिल्हा सचिव श्री. सुनिल धंदरे, जिल्हा संघटन प्रमुख विनोद चन्ने, जिल्हा कोषाध्यक्ष रवि आंबटकर, राजू मोहुर्ले, महेश ढेकरे, अंकुश कोंराते, किशोर वाटेकर, नरेंद्र आस्वले, खुशाल साखरकर, कुंदन रायपुरे, रमेश वझे, विलास बावणे, वासुदेव कुबडे, मंगेश चौरे, प्रमोद येरूरकर, रमेश मून, मुशिर खान, प्रकाश पात्रा, जनार्धन गुंजेकर, विश्वेश्वर राउत, राजू बडगे, राकेश पवार, प्रमोद हिंगे, विनोद शेलोकर, विजय बोरेकर, अरविंद उमरे, वामन टोंगे, प्रणीत वाटेकर, राकेश तिरणकर यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये