ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सायकली चोरणारा भामटा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

4 हजार 800 रु. चा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

       दि. 14/2/2024 रोजी संध्याकाळी 6 ते 11 दरम्यान पो. स्टे. वर्धा शहर, मधील शिखबेडा येथे कोणी तरी एक इसम संश्येत रित्या काही कमी रुपयात सायकल विकण्याकरिता आला अशी गोपनीय महिती मिळताच घटनास्थळी तबोडतोब पोहचून आरोपी 1) उमेश पूर्शोत्तम मडावी वय 43 वर्ष रा.बोरगाव मेघे.वर्धा यास ताब्यात घेऊन, त्याची कसून चौकशी केली असता त्याने सदर गाडी ही वर्धा शहर पो. स्टे. हद्दीतील जिल्हा परिषद शाळा बोरगाव मेघे येथून चोरल्याची कबूली दिली, त्याची कसून सखोल चौकशी केली असता,

       त्यांनी वेगवेगळया ठिकाणावरून चार सायकली चोरल्याची कबुली दिली, वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेली सायकली जप्त करण्यात आल्या, व वर्धा शहर पोलीस स्टेशन ला ताब्यात देऊन चार गुन्हे उघडकीस आणले जु.कि 4800/- रु. चा मुद्देमाल जप्त करून सदर पो.स्टे. वर्धा शहर येथे आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

              सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सा. वर्धा श्री नूरल हसन साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक श्री. सागर कवडे सा. यांचे आदेशान्वये पो नी. श्री कांचन पांडे स्था गु शा. वर्धा यांचे मार्गदर्शनात पो उप नि सलाम कुरेशी, नरेन्द्र पाराशर, सचिन इंगोले, अमरदीप पाटिल,राम ईप्पर, नितीन इटकरे, संगसेन कांबळे, मिथून जिचकार, अरविंद इंगोले, चालक गणेश खेवले सर्व स्था.गु. शा. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये