ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री शिवाजी कनिष्ट महाविद्यालयाचा बारावीचा १०० टक्के निकाल..!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळ अमरावती मार्फत घेण्यात आलेल्या फेब/मार्च 2025 च्या श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव मही वर्ग बारावी कला शाखेचा निकाल १००% लागला असून त्यामध्ये परीक्षेला प्रविष्ठ झालेले ३० विद्यार्थी पैकी ३० ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.यामध्ये प्राविण्य श्रेणी विद्यार्थी संख्या ११ प्रथम श्रेणी विद्यार्थी संख्या १२,द्वितीय श्रेणी विद्यार्थी संख्या ७ आहे.

यापैकी प्रथम क्रमांक कु आचल समाधान काकडे ८४.५० टक्के मिळवले,द्वितीय क्रमांक कु जयश्री प्रमोद देशमुख ८३.८३ टक्के मिळवले, तृतीय क्रमांक कु उमा बबन बनसोडे ८२.८३ टक्के मिळवले, चौथा क्रमांक कु वैशाली मधुकर माळी ८२.५० टक्के मिळवले, तर पाचवा क्रमांक कु पूजा सुधाकर बरडे ८२.०० मिळवले, या सर्व विद्यार्थिनींनी या यशाचे श्रेय आई वडील व प्राचार्य जी.एस जाधव सर, पर्यवेक्षक राजु चित्ते सर,आढाव सर,जायभाये सर,नागरे सर,व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये