ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात 41 रक्तदात्यांनी केले रक्तदान 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा शहरासह पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या पिंपळनेर येथील श्री मारुती मंदिर संस्थान मध्ये श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रम घेत साजरा करण्यात आला सकाळी चार वाजेपासूनच श्री हनुमान भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी करणे सुरू केली होती संस्थांनचे वतीने अनेक वर्षापासून याच दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.

आज दिनांक 23 एप्रिल रोजी वाढत्या तापमानात (40 डिग्री तापमानात)सुद्धा या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये 41 रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावला रक्तदान शिबिर यशस्वीते साठी उद्योजक मनीष काबरा संस्थांनचे प्रमुख सचिन ताराचंद मल्लावत तर रक्तसंकलना साठी जालना येथील जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी वंदना शेळके पुण्यवती हिप्पा सरिता खंडारे शिवानी पुरोहित यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये