ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नळाच्या पाईप लाईनसाठी खोदलेल्या नाल्या कधी बुजवणार

नागरिक त्रस्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरात अनेक ठिकाणी नळाच्या पाईप लाईन साठी खोदलेल्या नाल्या त्वरित बुजवत नसल्याने त्या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पोस्ट ऑफीस च्या मागे असलेल्या स्वप्नूर्ती रेसिडेन्सी ला लागूनच जे सी बी च्या सहाय्याने खोल नाली खोदून ठेवली आहे, एक आठवडा होऊन गेला तरी अद्याप नाली न बुजवल्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, चार चाकी वाहन ठेवण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.

संबंधित अधिकारी यांनी तत्काळ संबंधित ठेकेदार ला तात्काळ पाईप लाईन चे काम पूर्ण करुन खोदलेल्या नाल्या त्वरित बुजविण्यास सांगावे अशी मागणी करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये