ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर येथील दत्त मंदिर मध्ये 26 व 27 डिसेंबरला दत्त जयंती महोत्सवचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

श्री गुरुदेव दत्त मंदिर, गडचांदूर येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री गुरू दत्तात्रेय जयंती महोत्सव चे आयोजन 26 व 27 डिसेंबर ला करण्यात आले आहे, दोन दिवस विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

26 डिसेंबर ला सकाळी 8 वाजता श्री गणेश मूर्ती व महादेव पिंड यांची प्राणप्रतिष्ठा होईल,त्यानंतर मंदिरातून पालखी व कलश यात्रा निघेल,गावातील प्रमुख मार्गाने भ्रमण करीत दत्त मंदिरात विसर्जित होईल,दुपारी 12 वाजता भजन व काल्याचे कीर्तन होईल.

27 डिसेंबर ला सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत महाप्रसाद चे वितरण करण्यात येणार आहेत,तरी भाविकांनी या धार्मिक कार्यक्रम मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वरदान दुर्गा उत्सव मंडळ व दत्त मंदिर कमिटी च्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये