ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पो. स्टे. सेवाग्राम हद्दीत नाकेबंदी करुन अवैध दारूची वाहतूक करणारे आरोपी अटकेत

आरोपीतांकडुन कारसह विदेशी दारुचा एकूण 3 लाख 85 हजारांवर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         दिनांक 28/03/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा अंतर्गत पथक पो स्टे सेवाग्राम परीसरात गुन्हेगार चेक व अवैद्य धंदयावर प्रो.रेड कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहितीवरून दयाल नगर वर्धा येथे राहणारा अजय कुकरेजा हा त्याच्या साथीदारासह त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या हुंडाई कंपनीच्या आय 10 गाडी क्रमांक एम एच 40 ए 7761 ने साकी बार वडगाव जि. नागपुर येथून पवनार मार्गने त्याचे राहते घरी देशी विदेशी दारूसाठा घेवून येत आहे अश्या माहिती वरून त्यांचेवर नाकेबंदी करून प्रो रेड केला असता, आरोपी 1) अजय उर्फ अज्जू मोतीराम कुकरेजा वय 38 वर्ष दयाल नगर वर्धा 2) संजय हुदाराज नानवाणी वय 28 वर्ष रा. दयाल नगर, वर्धा याचे ताब्यातील एम एच 40 ए 7761 क्रमांकाच्या कारमधून पंचांसमक्ष 1) दोन खर्ड्याच्या खोक्यात आफीसर चॉईस ब्लू कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल.च्या 72 सिलबंद शिश्या किंमत 25,200/- रु 2) तिन खर्डाच्या खोक्यात ऑफिसर चॉईस कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल च्या 144सिलबंद शीशा किंमत 43,200/- रु.3) एका खर्ड्याचे खोक्यात 180 एम एल च्या रॉयल्स स्टॅग कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेल्या 48 सीलबंद शीशा किंमत 16,800/- रू.4) एक जुनी वापरती पांढऱ्या रंगाच्या हुंडाई कंपनीच्या आय 10 गाडी क्रमांक एम एच 40 ए 7761 किंमत 3,00,000/- रू. असा एकुण जु.कि 3,85,200/- रुपये चा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपीताना जप्त दारुबाबत विचारणा केली असता त्याने स्वतः चे कारने जिल्हा नागपुर येथे जाऊन साकी बार मालक यांच्याकडून विदेशी दारू माल घेतला, अशी माहिती दिली. सदर आरोपीतांविरुध्द पो स्टे सेवाग्राम येथे नमुद कलमान्वये गुन्हा नोंद करून तपासावर आहे.

      सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. सागर कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड तसेच पोलीस निरीक्षक मनोज गभणे स्थानीक गुन्हे शाखा यांचे निर्देषाप्रमाणे पोउपनि अमोल लगड, पोलीस अंमलदार सचीन इंगोले, प्रमोद पिसे रामकिसन इप्पर, अरविंद इंगोले, सर्व स्थानीक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये