ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी पथकांनी नाकेबंदी करून आरोपींकडून विदेशी दारूसाठा व दुचाकी केली जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस पथकांनी गोपनीय माहिती मिळाली असतांना पुलफैल वर्धा येथे नाकेबंदी करून आरोपींवर प्रोव्हीशन रेड करुन मोक्यावर आरोपी नामे सुदर्शन उर्फ ददया सुनील जवादे वय 24 वर्ष राहणार दिग्रस ता.जिल्हा वर्धा हल्ली मुक्काम पुलफैल वर्धा आरोपी नामे सन्नी उर्फ विक्की सुनील गोंडाणे वय 25 वर्षे राहणार पुलफैल वर्धा यांच्या ताब्यातून एका ग्रे रंगाची सुजूकी कंपनीची बर्गमॅन दुचाकी मोपेड वाहन क्रमांक एम एच 32 ए यु 4107 त्या मोपेडवर दोघांच्या मधात खरडयाचे खोक्यामध्ये व कापडी पिशवीमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या 180 एम एल च्या ऑफिसर चाईस कंपनीच्या शिश्या 500 एम एल च्या बीयर दारूने भरून असलेल्या एका खरडयाचे खोक्यामध्ये कासबर्ग असा एकूण किंमत 1,24,900/- रुपये चा माल अवैधरित्या मिळून आल्याने जप्ती पंचनामाप्रमाणे जप्त करण्यात आला.

सदर आरोपीतांना विदेशी दारूचा माल कोठून आणला याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदर विदेशी दारूचा माल हा सावंगी आसोला जिल्हा नागपूर हायवे रोडवरील लेयोपोलेड 9 नावाने असलेल्या रेस्टॉरंट व बार चे चालक व मालक अभिषेक चिंतलवार पत्ता सावंगी आसोला जिल्हा नागपूर यांचे बार मधून आणले आहे.

असे सांगितल्याने बार मालक अभिषेक चिंतलवार यांनी त्यांचे बार परवान्याचे उल्लंघन करून वर्धा जिल्हात दारुबंदी असल्यासबंधी माहिती असतांना सुध्दा वर्धा जिल्ह्यातील आरोपीतांना यास दारुचा माल देवून त्यास सहकार्य केल्याने त्याचे कृत्य म‌.दा.का.कलम 82 प्रमाणे होत असल्याने सदर गुन्ह्यात बार मालकाला आरोपी बनविण्यात आले आहे.पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे आरोपीतां विरुद्ध अपराध क्रमांक 528/2024 कलम 65 अ‌.ई.77 अ 82 83 म .दा .का.सहकलम 3(1) 181 130/177 मो .वा .का अन्वये नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नुरुल हसन वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कुमार कवडे यांचे विशेष मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या सुचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक परवेज खान उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाचे पोलिस हवालदार अमर लाखे पोलिस शिपाई मंगेश चावरे पवन निलेकर समीर शेख यांनी यशस्वीपणे पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये