ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दोन व्यक्तीचे हरविले मोबाईल वर्धा पोलिसांनी शोधून दिले एक तासात….

पराग पोटे पोलिस निरीक्षक वर्धा शहर यांच्या कामाची केली फिर्यादीने प्रशंसा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक रोजी फिर्यादी नामे अजय यशवंत चव्हाण राहणार धुनिवाले मठाजवळ नालवाडी यांचा सॅमसंग एम 51 कंपनीचा मोबाईल किंमत 24,000/- रुपये एका मधून हरविलेल्याची रिपोर्ट पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे देण्यात आली याची नोंद पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे दाखल करून तपासा करीता लावण्यात आली.

तसेच फिर्यादी नामे अरविंद झाडे राहणार झाडे लेआऊट सिंदी मेघे वर्धा यांचा वन प्लस कंपनीचा मोबाईल किंमत 15,000/- रुपये एस बी आय टे्झरी शाखा नागपूर रोड वर्धा येथून हरविलेल्याची बाबत तक्रार पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे देण्यात आली व याबाबत माहिती पोलिस निरीक्षक पराग पोटे यांना देण्यात आली व या गोष्टीचा तपास डी बी पथकांनी एका तासात करून फिर्यादी यांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावून त्यांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक नुरुल हसन वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक पराग पोटे पोलिस स्टेशन वर्धा शहर व पोलिस हवालदार पंकज भरणे प्रशांत वंजारी पोलिस शिपाई श्रावण पवार यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये