ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवन तोगरे मृत्यू प्रकरणात सिंधू जाधव यांना न्यायालयीन कोठडी

पुढील तपास सुरू आहे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील पाटागुडा येथील मृत्यक रूग्णसेवक जिवन तोगरे(२४) यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून या मृत्यू प्रकरणात पल्लेझरीच्या सिंधू जाधव यांना सदोष मनुष्यवध व अट्रासिटीच्या गंभिर कलमाखाली ६ डिसेंबर रोजी जिवती पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.एक दिवसाच्या पोलिस कोठडी नंतर काल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

              जिवती -तालुक्यातील पिट्टीगुडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत दि.४ जुन रोजी पाटागुडा येथील रूग्णसेवक जिवन तोगरे (२४) यांचा जंगलपरिसरात संशयास्पद कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती.जिवन तोगरे यांच्या यांच्या मरणावरून पिट्टीगुडा पोलिसांनी पल्लेझरीच्या सिंधू जाधव हिच्यावर गुन्हा दाखल केला होता.परंतु मृत्यक जिवनचे नातेवाईकांनी हत्याचा आरोप करून मोर्चा,व उपोषणही केले होते.

त्यामळे पिट्टीगुडा पोलिसांकडून तपास काढून जिवती पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांच्याकडे तपास कार्य सोपविण्यात आले होते.त्यानुसार जिवती पोलिसांनी रूग्णसेवक जिवन तोगरे यांच्या मृत्यू प्रकरणचा योग्य तपास करून पल्लेझरीच्या सिंधू जाधव हिला सदोष मनुष्यवध व अट्रासिटीच्या गंभिर कलमाखाली अटक करण्यात आली होती एक दिवसाच्या पोलिस कोठडी नंतर तिला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून पुढील तपास गडचांदूर उपविभागीय पोलिस अधिकारी करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये