ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखा वर्धा कडून पो.स्टे. सेलु येथील मोटर पंप चोरीचे गुन्ह्यातील आरोपींना अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पो.स्टे. सेलू येथे सुकळी बाई शिवारात शेतातील मोटर पंप अज्ञात चोराने चोरी केल्याचे लेखी रिपोर्ट वरून अप क्र. 430/2024 कलम 379 भा द वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी नामे 1) शिवाशीष अशोक सराटे, वय 23 वर्षं, 2) सुरज सुरेशराव मुंडेकार, वय 21 वर्ष, दोन्ही रा. रा. जावंई नगर, वरूड, ता.जि.वर्धा यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असता.,

त्यांनी सुकळी शेत शिवारातील मोतरपंप त्यांचे साथीदार अभिजित भेदुरकर, यश इंगोले, व यश सर्व र रामनगर वर्धा यांचे संगनमताने सह केल्याचे व सदर गुन्ह्याची कबुली दिली. सदर आरोपितांना पुढील तपासकामी पो.स्टे. सेलु येथे अटक करण्यात आलेली असून सदरचा गुन्हा 24 तासाचे उघड करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नूरुल हसन सा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सागर कवडे सा. यांचे आदेशान्वये पो नि संजय गायकवाड यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पो उप नि अमोल, लगड, पोहवा हमीद शेख, श्रीकांत खडसे, राजेश तिवस्कर, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, राम इप्पर, प्रदीप वाघ, अरविंद इंगोले सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. तिरुपती राणे सा. पोहवा गणेश राऊत, देवा वणवे पो स्टे. सेलू हे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये