५.२१३ ग्रॅम किंमत अंदाजे ५२ हजारावर गांजा जप्त
एलसीबीची कारवाई ; वाहन, मोबाइल एकूण किं. १६ लाख ४९ हजारावर मुददेमाल ताब्यात

चांदा ब्लास्ट
मा. पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी स्था. गु.शा. चंद्रपुर यांना जिल्हयात अमंली पदार्थ विक्री करणे व बाळगणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा यांनी एक विशेष पथक तयार केले असता.,
दि. १/९/०२३ रोजी गोपनीय माहीती मिळाली की बल्लारशा बायपास रोड चंद्रपुर येथे एका पांढऱ्या रंगाची स्कॉरपीओ गाडी क्र. एम.एच. ३३ ए.सी. ११०१ मध्ये काही संशईत ईसम हे अमंली पदार्थ आणुन ते विक्री साठी ग्राहक शोधत आहेत. अशा माहीती वरून पोनि स्था. गु. शा. चंद्रपुर यांचे आदेशा वरून विशेष पथकाचे पो. उप नि. अतुल कावळे व सोबत पो. स्टाफ छापा कार्यवाही करीता रवाना होउन संशयीत वाहनाचा बल्लारशा बायपास रोडने शोध घेत असताना नमुद संशयीत वाहन हे बजाज विद्या निकेतन शाळेच्या समोर उभे असल्याचे दिसुन आले.
त्यावेळी वाहन चालक व साथीदारास अधिक विचारपूस केली असता उडवा उडवाउडवीचे उत्तर दिल्याने संशय निर्माण झाल्यामुळे, पंचासह वाहनाची तपासनी केली असता एका निळया प्लॅस्टीक पन्नी मध्ये अंदाजे ५.२१३ ग्रॅम किंमत अंदाजे ५२,१३० /- रू. चा गांजा अमंली पदार्थ मिळुन आला.
यावेळी आरोपी यश राज दुर्योधन, वय १८ वर्ष, रा. बजाज शोरुम मार्ग टिचर कॉलनी, गडचीरोली, नेहाल इकरार ठाकुर वय २१ वर्ष, रा. गोकुळ नगर गुरुवदारा जवळ गडचिरोली, सगिर खान ननुआ खान, वय ३२ वर्ष, ह.रा. गोकुळ नगर गुरुवदारा जवळ गडचिरोली मुळे राह निकोनी साहायपुर, गौतमबुद्ध नगर, उत्तर प्रदेश, असे, आरोपी सोबत अंदाजे ५.२१३ ग्रॅम किंमत अंदाजे ५२,१३० /- रू. चा गांजा अमली पदार्थ व सदर गून्ह्यामध्ये वापरलेले वाहन किमंत अंदाजे १५,०००,००/- रू. आरोपीचे तिन मोबाईल किंमत अंदाजे ९७,०००/- रू असा एकुण १६,४९,१३० /- रू चा मुददेमाल ताब्यात घेउन पो.स्टे. रामनगर येथे अप क्र. ९६२/ २३ कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब),४१,४३ एन.डी.पी.एस. ३४ भादवी गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम (एन. डी.पी.एस.) १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.स्टे. रामनगर हे करीत आहे.
सदर कार्यवाही मा. श्रि रविंद्र परदेशी पोलीस अधिक्षक चंद्रपुर श्रिमती रिना जनबंधू अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर श्री नंदनवार उपविभागिय पोलीस उधिकारी चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा पो.उप नि. अतुल कावळे, पो.हवा शकील शेख, नापोकों अनुप डांगे, मिलींद चव्हाण नितेश महात्मे जमीन पठाण, पोकों प्रमोद कोटनाके, प्रसाद धुळगंडे, चालक पोकों रूपभ बारसिंगे, यांच्या पथकाने केली.