ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आगामी सण उत्सव व लोकसभा सार्वत्रिक निवडणूक संबंधाने रूट मार्च

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

       पोलीस स्टेशन अल्लीपूर अंतर्गत आगामी सण उत्सव व लोकसभा सार्वत्रिक निवडणूक संबंधाने आज दिनांक 13.04.2024 रोजी खालील गावांमध्ये रूट मार्च घेण्यात आले. दरम्यान पोलीस स्टेशन अल्लीपूर येथील 02 अधिकारी 15 पो अंमलदार 33 सैनिक तसेच srpf चे 04 अधिकारी 95 पो अंमलदार हजर होते. सदर रूट मार्च दरम्यान रायफल, हेल्मेट, लाठी, ढाल सह रूट मार्च काढण्यात आली.

1) अल्लीपूर

मार्ग :- पोलीस स्टेशन अल्लीपूर येथून सुरू करून बस स्टॅन्ड चौक, गरोबा चौक, स्टेट बँक, मस्जिद-ए-गौसिया, बाजार चौक, विठ्ठल मंदिर, आबाजी मंदिर, पोलीस स्टेशन अल्लीपूर

2) कानगाव

मार्ग :- बस स्टॅन्ड चौक येथून प्रारंभ, बौद्ध विहार, वार्ड क्रमांक 2, ग्रामपंचायत कार्यालय नांदगाव, जामा मस्जिद कानगाव, बाजार चौक, बस स्टॅन्ड चौक

3) तळेगाव टाळाटुले

मार्ग :- ग्रामपंचायत कार्यालय येथून प्रारंभ करून, शिवाजी चौक, वानर देव चौक, झेंडा चौक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भिवापूर फाटा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये