ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा फुले यांचे कार्य राष्ट्र उभारणीसाठी प्रेरणादायी : प्राचार्य डॉ. बी. डी. चव्हाण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर :- एकोनिसावे शतक हे प्रबोधनाचे शतक मानले जाते. याच शतकात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून प्राथमिक शिक्षण मोफत व शक्तीचे करण्याचा विचार सर्वप्रथम मांडला. ते केवळ बोलके सुधारक नव्हते तर कर्ते समाजसुधारक होते. भारतीय समाजाच्या दाहक

वास्तवातून त्यांचा सामाजिक विचार उभा राहिला. त्यांनी समाजपरिवर्तनाचा विचार प्रभावी केला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्रिशिक्षण, केशवपण बंदी, अशपृष्यता निवारण, स्त्रि- पुरुष समानता, बालविवाह बंदी, विधवा विवाहाचा पुरष्कार, अंधश्रद्धा – अज्ञानाचा विरोध, शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक इत्यादी कार्यासाठी खर्ची घातले. त्यांचे हे कार्य राष्ट्र उभारणीच्या जडणघडणीसाठी प्रेरणादायी ठरले असे प्रतिपादन महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी. डी. चव्हाण यांनी केले.

 स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात महात्मा फुले जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, महात्मा फुलेंच्या विचारांचा जयजयकार करण्यापेक्षा त्यांचे विचार वैयक्तिक आणि समजजीवनात अंमलात आणण्याची गरज आहे. वास्तव जीवनात जर त्यांच्या विचारांकडे डोळेझाक केले तर तो आपला आत्मघातकीपणा ठरेल असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश मेश्राम यांनी तर आभार प्रा. डॉ. किशोर चौरे यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये