पंचायत समिती सावलीच्या शिक्षण विभागाचा कारभार गटशिक्षणाधिकारी विना सुरु
जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट
शिक्षण क्षेत्र हे पवित्र क्षेत्र आहे. या क्षेत्राचा थेट संबंध विद्यार्थ्यांशी येत असते. उद्याचा सुजाण नागरिक घडविण्याची महत्वाची जबाबदारी शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांवर असते. अशा महत्वाच्या क्षेत्रातील पंचायत समिती सावली चे गटशिक्षणाधिकारी पद आजमितीला १० दिवस होऊनही रिक्त आहे. पंचायत समिती सावली चे प्रभारी गटशिक्षणाधिकारी संध्या कोनपत्तीवार ह्या नियतवयोमानाने दि.३१ मार्च २०२४ ला सेवानिवृत्त झाले.
सेवानिवृत्त दिनी सदर पदाचा प्रभार याठिकाणी कार्यरत शिक्षण विस्तार अधिकारी यांचे कडे देणे महत्वाचे असतांना आज दहा दिवस होऊनही गटशिक्षणाधिकारी पदाचा रीतसर प्रभार कोणाकडेही देण्यात आलेला नाही. परिणामी शिक्षकांचे अनेक कामे प्रलंबित असून अडचण निर्माण झालेली आहे तसेच प्रशासकीय कामाचा खोळंबा झालेला आहे.
तरी लवकरात लवकर एक दोन दिवसांत गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार देण्यात यावा व शिक्षकांना व प्रशासनाला होत असलेला नाहक त्रास थांबवावा अशी शिक्षक संघटनांकडून व गावक-यांकडून होत आहे .दोन दिवसांत गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार न दिल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा स्थानिक पदाधिका-यांनी दिलेला आहे.



