ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीकृष्ण राधा हे आपले धार्मिक सांस्कृतिक मानबिंदू : संध्या विरमलवार

बालगोपालांच्या उदंड प्रतिसादात श्रीकृष्ण राधा रुपसज्जा स्पर्धा संपन्न

चांदा ब्लास्ट
भगवान श्रीकृष्णाने जन्मापासून संघर्ष बघितला. कधी हार मानली नाही. तत्व आणि भावना याची सांगड घालत, आयुष्य कसं जगावं याचं थेट प्रशिक्षण आपल्या उभ्या आयुष्यातून श्रीकृष्णाने दिले.श्रीकृष्णाला  नीट समजून घेतलं की आयुष्याचे पैलू आपोआप उलगडायला लागतात आणि बरेच पडणारे प्रश्नही सुटायला लागतात. श्रीकृष्णाची रूपे अनेक . त्या रुपांच्या माध्यमातून बालमनावर संस्कार व्हावेत व त्यांचे भावविश्व समृद्ध व्हावे म्हणून संस्कार भारती तर्फे दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते , असे प्रतिपादन संस्कार भारतीच्या अध्यक्ष सौ संध्या विरमलवार यांनी केले.
दि.१० सप्टेंबर रोजी संस्कार भारती चंद्रपूर तर्फ़े विवेकनगर येथील श्रीराम मंदिर सभागृहात श्रीकृष्ण राधा रुपसज्जा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सौ संध्या विरमलवार बोलत होत्या. यावेळी मंचावर विवेकनगर सेवा समिती कार्यकारिणीचे उपाध्यक्ष  श्री देवेंद्र मोगरे, रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक वसंतराव थोटे, स्पर्धेचे परीक्षक प्रशांत कत्तुरवार, प्रशांत नवघरे, चारुशीला पेकडे – येवले, संस्कार भारतीचे जिल्हा मंत्री मंगेश देऊरकर, उपाध्यक्ष डॉ राम भारत, स्पर्धा संयोजक नूतन धवने यांची उपस्थिती होती.

गेल्या काही वर्षांत स्पर्धेत राधेचा सहभाग वाढल्याने बालकांना प्रोत्साहन म्हणून यावर्षी श्रीकृष्ण राधा रुपसज्जा असे स्पर्धेचे स्वरूप करण्यात आल्याचे सौ विरमलवार म्हणाल्या.

ही स्पर्धा ० ते ५ आणि ६ ते १० या वयोगटात घेण्यात आली. दोन्ही गटात एकूण ४३ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात लहान गटात प्रथम युग फौर ,
द्वितीय क्रिशिका मेडपल्लीवार , तृतीय  श्रिया सावे , प्रोत्साहनपर लावण्या बेलगे,
श्राव्या देशपांडे हे विजेते ठरले. मोठया गटात प्रथम  किमया सपाटे, द्वितीय चैतन्या ठाकरे, तृतीय अंजली आक्केवार, प्रोत्साहनपर  अवनी श्रोते, आराध्या झाडे हे बालक विजेते ठरले. विजेत्यांना प्रमाणपत्र,सन्मान चिन्ह व रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

स्पर्धेचा शुभारंभ श्रीमती पूनम झा, पद्मा शर्मा यांनी सादर केलेल्या स्वागत नृत्याने झाला. संस्कार भारती सदस्यांनी ध्येय गीत सादर केले. प्रास्ताविक नूतन धवने यांनी तर संचालन स्वरूपा जोशी यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभापूर्वी प्राजक्ता उपरकर यांनी कृष्ण आराधना नृत्य रुपात सादर केली. आभार प्रदर्शन अपर्णा घरोटे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सचिव लिलेश बरदाळकर कोषाध्यक्ष सुजीत आकोटकर, राज ताटपल्लीवार, पूर्वा पुराणिक आदींनी अथक परिश्रम घेतले. स्पर्धेला बालगोपालांचा लक्षणीय प्रतिसाद लाभला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये