ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध दारूची वाहतूक व दारूविक्री करणाऱ्यावर कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 04/03/2025 रोजी पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील गुन्हे प्रगटीकरण पथकात्ती अंमलदार यांना माहिती मिळाली की दोन ईसम पांढऱ्या रंगाच्या बर्गमॅन गाडीवर बसून सालोड ते सावंगी रोडवरील सैनी हॉटेलजवळून दर्शना चर्चच्या रोडने विदेशी दारूची वाहतूक करणार आहे. अशा माहितीवरुन सदर ठिकाणी रवाना होवून नाकेबंदी करून आरोपी नामे १) शुभम राजेश दुबे वय 23 वर्ष रा. जैस्वाल हाउस जवळ, महादेवपुरा वर्धा व त्याचे मागे बसून असलेला आरोपी क. 2) आयुश सुभाषराव केवट वय 21 वर्ष रा. वार्ड नं. 5. ईतवारा बाजार वर्धा, ता जि. वर्धा यांचे ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या सुझुकी बर्गमॅन मोपेड गाडी क. क. एम.एच. 32 ए.यू. 4616 चे पायदानावर ठेवून असलेल्या चुंगडीची पाहणी केली असता चुंगडीमध्ये १) दोन खडर्याच्या खोक्यामध्ये टूबर्ग कंपनीच्या 500 एम.एल च्या एकुण 48 वियरच्या टिनाचे कॅन ज्यावर बेंच नं. 1280 असा असलेला, प्रती कॅन 300/ रू. प्रमाणे एकूण किं 14,440/रू. तसेच मोपेड गाडीच्या डिक्कीची पाहणी केली असता डिक्कीमध्ये 2) एका खडर्याचे खोक्यात 180 एम.एल ऑफीसर चॉईस ब्ल्यू कंपनीच्या 12 निपा ज्यावर बेंच नं 495 असा असलेला, प्रती निप 300/रु. प्रमाणे किं. 3600/रू. ३) एक पांढऱ्या रंगाची सुझुकी बर्गमॅन मोपेड गाडी क क एमएच 32 ए.यू. 4616 कि. 1,00,000/रू. असा एकुण जु.कि 1,18,000/रु. चा माल अवैधरित्या बिना पासपरवाना वाहतूक करीता असताना पंचासमक्ष मिळून आल्याने पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून आरोपीतांन विरुध्द गुन्हा क. 203/2025 कलम 65 ई 77 अ. 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला

तसेच दि. 06/03/2025 रोजी माहिती मिळाली की मौजा उमरी मेघे येथे राहणारी श्रीमती योगिता तिडके ही आपले राहते घरी गावठी मोहा दारूची चोरून लपून विक्री करीत आहे. अशा माहितीवरून पोस्टाफ व पंचासह तिचे राहते घरी दारूबाबत रेड करून तिचे राहते घराची घरझडती घेत असताना तिचे घरासमोर अंगणात असलेल्या तिचे सुझुकी एसेस मोपेड गाडी क. एम.एच 32 ए.क्यू 7864 चे डिक्कीमध्ये 1) 14 प्लास्टीकच्या शिश्यामध्ये प्रती शीशी 1 लि. प्रमाणे 14 लि. गावठी मोहा दारू. किं. 1400/रू. चा मुददेमाल मिळून आला. 2) एक सुझुकी एसेस मोपेड गाडी क. एम.एच 32 ए क्यू 7864 किं 50.000/रु. असा एकुण जु.किं. 51,400/रू चा माल अवैधरित्या मिळून आल्याने घटनास्थळ जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करून नमुद आरोपी विरुध्द गुन्हा क. 214/2025 कलम 65 ई महाराष्ट्र दारूबंदी कायदा, सहकलम 130/177 मोवाका प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री संदिप कापडे सा. ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोहवा सतिष दरवरे, संजय पंचभाई, अनिल वैदय, निखील फुटाणे, अमोल जाधव यांनी केलेली असून गुन्हयाचा पुढील तपास पो.हवा संजय पंचभाई हे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये