ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध रेती तस्करी करणारी हायव्हा व ट्रॅक्टर जप्त

कोरपना तहसीलदाराची धडक कारवाई.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना :-कोरपना तालुक्यातील नांदाफाटा आवारपूर बिबी गडचांदूर या औद्योगिक परिसरात मागील दोन महिन्यापासून मोठ्या प्रमाणात विना खनिज परवाना अवैध रेतीची साठवणूक करून विक्री करण्याचा गोरख धंदा जोमात सुरू होता या विरोधात अनेक वृत्तपत्रांमधून सातत्याने वृत्त प्रकाशित होत असल्याने बीबी येथील रेती तस्कर काशिनाथ शेरे यांचे कडून बातमीदार सतीश जमदाडे याला रेती तस्करीच्या बातम्या लावते म्हणून महाराण करण्यात आली होती रेती तस्कर काशिनाथ शेरे याचे सह तीन जणांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत पोलीस स्टेशन गडचांदूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेती तस्कराकडून पत्रकाराला मारहाण झाल्याने या प्रकरणाची तहसीलदार रंजीत यादव (IAS) यांनी गंभीर दखल घेत विना गौण खनिज परवाना अवैध रेती तस्करी करणाऱ्या व्यावसायिकावर मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये कारवाई केल्या आहेत

दिनांक १२ जानेवारी च्या रात्री पहाटे ३ वाजताचे सुमारास बीबी येथील रेती तस्कर काशिनाथ शेरे यांच्या मालकीची ट्रॅक्टर व एक हायव्हा रेती तस्करी करताना पकडण्यात आले यात एम.एच.३२ बी.झेड.६९६६ क्रमांकाची हायव्हा विना क्रमांकाचे ट्रॅक्टर,जप्त करण्यात आले असून ट्रॅक्टर मधे १ ब्रास तर हायव्हा मधे ८ ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आले पत्रकाराला मारहाण करणाऱ्या रेती तस्करावर कारवाई करत त्याच्या मुसक्या आवरल्याने परिसरातील अवैद्य गौण खनिज परवाना वाहतूक करणाऱ्या तस्करांची धाबे चांगलेच दणाणले आहेत

राज्यमार्गांवरच चालतो रेती तस्करीचा खेळ

गडचांदूर वणी राज्य मार्गावर बीबी ग्रामपंचायतीचे हद्दीत दुर्गा माता मंदिर समोर वाळूचा मोठ्या प्रमाणात साठा करून नंतर चळ्या दराने विक्री करण्याचा गोरख धंदा मागील दोन वर्षापासून सातत्याने राजरोसपणे दिवसाढवळ्या सुरू होता तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस विभागाने आजपर्यंत याठिकाणी कुठलीही कारवाई केली नाही याबाबत प्रशासनाला विचारणा केली असता अधिकारी सांगायचे की आम्ही जेव्हा जातो तेव्हा मंदिराच्या कामाकरिता रेती आणली असे उत्तर देण्यात येत असल्याने आम्ही कधी कारवाई केली नाही मंदिराच्या बांधकामाचा आळोसा घेत रेती तस्करीचा गोरखधंदा केला जात होता येथील रेती साठवणुकी बाबत वृत्तपत्रातून वृत्त प्रकाशित करण्यात आल्याने पत्रकाराला मारहाण करण्यात आली पत्रकाराला मारहाण झाल्यावरही पोलीस विभाग तलाठी व मंडळ अधिकारी यांनी रेतीसाठ्यावर धाड टाकून कारवाई केली नाही नव्याने रुजू झालेले तहसीलदार रंजित यादव यांनी तक्रारीची दखल घेत मोठ्या शिफातीने

पहाटे ३ वाजताच्या सुमारास हायवा द्वारे रेती उतरविताना कारवाई केली तहसीलदारांच्या धाकड कारवाईने परिसरातील रेती तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत

पत्रकाराला मारहाण अदखलपात्र गुन्ह्याची नोंद हास्यास्पद

गडचांदूर नगर परिषदचे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद जोगी याने याने पत्रकार गणेश लोंढे यांचा मोबाईल हिसकावून तो आपटून खुर्चीने मारहाण केली पत्रकाराचा मोबाईल हिसकावून आपटून फोडण्यात आला खुर्चीने मारहाण करण्यात आली सदर घटना २ पत्रकारासमोरच घडली या प्रकरणात पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत शरद जोगी याचे वर गुन्हा दाखल करण्याऐवजी गडचांदूर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करणे हास्यस्पद वाटत असून राजकीय वलय असल्याने गडचांदूर पोलिसांनी दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली नाही गडचांदूर पोलिसांना पत्रकार संरक्षण कायद्याचा विसर पडला की काय असे मत अनेकांनी व्यक्त केले कुठलीही शासन बांधकाम परवानगी न घेता गडचांदूर नगरपरिषद चा उपाध्यक्ष टोली जंग इमारत उभी करतो वाहनांकरिता कुठलीही पार्किंग व्यवस्था नाही गडचांदूर नगरपरिषद चा उपाध्यक्ष असल्याने व राजकीय वलय असल्याने प्रशासनिक अधिकारी शरद जोगी यांचे विरोधात कुठलीही कारवाई करीत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहेत पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता, पत्रकार संघाकडून आंदोलन व वेळ पडल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती पत्रकार संघाच्या जिल्हा पदाधिकारी यांच्याकडून देण्यात आल्या आहेत

तस्करांची गय केली जाणार नाही

विना गौण खनिज परवाना वाळू मुरूम,तस्करी, गिट्टी वाहतूक व उत्खनन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे बिबी ग्रामपंचायतचे हद्दीत पहाटे ३ वाजता चे सुमारास विना गौण खनिज परवाना ९ ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून हायवा व बिना नंबरचे ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली आहे हायवा मालकाकडून ३२४८००/- रुपये व ट्रॅक्टर ट्रॉली मालकाकडून

११५६००/- रुपये दंड वसूल करण्याची कारवाई करण्यात येणार आहेत. वाळू तस्करी रोखण्याकरिता संपूर्ण तालुक्यात वेगवेगळी पथके नेमण्यात आली असून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये