ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजुऱ्यात शेतकरी संघटनेला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांसह अनंता येरणे भाजपात!

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत केला भाजप प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

शेतकरी संघटनेचे माजी शहराध्यक्ष तसेच तेली समाज युवक मंडळाचे अध्यक्ष अनंता येरणे यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह मंगळवारी (दि. १२) विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.

राजूरा येथे आयोजित क्रिडा व सांस्कृतिक महिला महोत्सवात राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते गळ्यात भाजपचे दुपट्टे टाकून त्यांनी भाजपचा झेंडा हातात धरला.

या पक्षप्रवेशात अनंता येरणे यांचेसह मनसेचे किशोर रागीट, जगदीश साठोणे, विपुल डोहे, शुभम बावणे, रमेश इटनकर, शारदा इटनकर, मंगेश अवचट, सुरेश हरणधरे, सचिन हरणधरे, कविता हरणधरे, गजानन इटनकर, सोनाली इटनकर, विनोद रागीट, प्रवीण बावणे, गजानन तडसे, विजय लोहबळे, उमदेव कापटे, विनोद साळवे, विठ्ठल गिरटकर, मनोहर इंगोले, प्रफुल ठाकरे, अमोल गिरटकर, विलास बुटले, मारोती जीवतोडे, ओमदेव इंगोले, सुभाष लांडे, रवी वैरागडे, दुलाराम मांढरे, पुंडलिक दाताळे, सुनील पोहणे, संजय पारखी, विनोद पांडव, विजय वाढई, भारत गुरनुले, तुफान वाघमारे, सचिन परसाले, कार्तिक मोहुर्ले, दिपक पिदुरकर, योगेश नोरलवार, खुशाल चौधरी, तिनकय्या नोरलवार, अहेमद शेख, संदीप लोनबल्ले, मोरेश्वर भोंगळे, शामसुंदर गोवारकर सर, स्वप्नील टाके, ज्ञानेश्वर पुसाम, राहुल खनके, प्रशांत डवरे, प्रवीण बावणे, गजानन तडसे, विजय लोहबळे, प्रफुल ठाकरे, ओमदेव इंगोले, राकेश पायपरे, नितीन साळवे, प्रज्वल भोंगळे, किरण गीते, अतुल हिंगाने, पंकज बावणे, राहुल काडे, संजय थेरे, संदीप टेकाम, दिलीप बोबडे, आकाश अत्राम, सुरज भगत, तुषार थेरे, दिलीप ठेंगणे, मोरेश्वर गिरसावळे, किशोर नांदेकर, चंदू दरेकर, मारोती गाडगे, हरी वासाडे, किशोर सपाट, मारोती काकडे, प्रशांत करमणकर, रामदास उकीनवार, रामदास नांदेकर, रवींद्र गाडगे, गणपत हंसकर, भीमराव दाहिले, प्रशांत मालेकर, साईनाथ गोरे, सुधाकर हंसकर, शैलेश देठे, विजय जेऊरकर, प्रशांत चोथले, शुभम वडस्कर, योगेश बोबडे, कुंदन वडस्कर, वैभव वांढरे, आशिष मोहुर्ले, उमेश सातपुते, प्रीतम राउत, अनिल जीवतोडे, रविकांत जीवतोडे, ज्ञानेश्वर मोरे, रवी पिपरे, वैभव चिडे, दर्शील चिडे आदींचा समावेश आहे.

राजुरा तालुक्यात युवा व्यावसायिक तसेच तेली समाजातील युवा नेतृत्व म्हणून सुपरिचित असलेल्या अनंता येरणे यांच्या भाजप प्रवेशाने राजुरा शहरात भाजपची ताकद वाढली आहे; तर अनंता येरणेंनी आपल्याबरोबर शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनाही भाजपची वाट दाखवल्याने राजुऱ्यात संघटनेला चांगलीच खिंडार पडल्याचे चित्र आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये