ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जुव्यात जिंकलेले पैसे दिले नाही याकारणा वरुन मृतकावर चाकुने वार

खुन करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा. व ५०००/-रु. दंड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा येथील मा. श्रीमती.आर.जे.राय सा. तदर्थ अत्ति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, वर्धा यांनी आरोपी नामे प्रशांत उर्फ पंप्पु गुरुदास तुमडाम वय ३४ वर्ष रा.आदीवासी कॉलीनी वर्धा, जि. वर्धा यांस १) कलम ३०२ भादवि मध्ये आजीवन कारावास व ५०००/-रु. दंड न भरल्यास ०३ महीने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

हकिकत या प्रमाणे आहे कि, यातील नमुद आरोपी व फिर्योदी हे एकाच मोहल्लातिल असुन फिर्योदीचा मुलगा राजेंश हा जुगारातिल पैसे जिंकला होता त्यामुळे आरोपीने पैसे मागितले त्यांने दिले नाही यांचा राग ठेवुन जुन्यावादाच्या कारणावरून आरोपीने त्याचे छातीवर, पोटावर व पाढीवर चाकुने २६ वार करुन कुरपणे ठार केले अशा रिपोर्ट वरुन गुन्हा नोंद प्रकरणाचा तपास तत्कालीन तपास अधिकारी सपोनि/सुरज तेलगोटे, पोनि/अशोक चौधरी व पोनि/धनाजी जळक, पो. स्टे रामनगर यांनी केला व आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे अप क्र. ५६०/१९ क ३०२ भादवि नुसार दोषारोप पत्र मा. न्यायालयात दाखल केले.

सरकारतर्फे अत्तीरिक्त सरकारी अभियोक्ता, श्रीमती वेदिका पाटील यांनी सदर प्रकरणात सरकार तर्फे एकुण १७ (पंधरा) साक्षीदार तपासले त्यांना पैरवी अधिकारी, तत्कालीन पोहवा/शंकर कापसे ब.नं. ७०५ व पोलीस उपनिरिक्षक नरेन्द्र धोंगडे, पो.स्टे. रामनगर यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात हजर करून मोलाची कामगरी बजावली. फिर्यादी व इतर सर्व साक्षदार, याची साक्ष ग्राह्य धरून अतीरिक्त सरकारी अभियोक्ता, श्रीमती वेदिका पाटील यांचा यशस्वी युक्तीवाद ग्राहय धरून मा. श्रीमती.आर.जे.राय सा. तदर्थ अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, वर्धा यांनी आरोपीस दिनांक २०/०४/२०२४ रोजी वरील प्रमाणे शिक्षा सुनावली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये