ताज्या घडामोडी

पोलिसांनी घातली जुगाराच्या अड्ड्यावर धाड

आठ आरोपींसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रेच राजुरा

राजुरा पोलिसांना शहरा नजीकच्या बामणवाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या जंगल परिसरातून जाणाऱ्या रेल्वे लाईन जवळ कमलाकर ठाकरे रा. राजुरा, भूपेंद्र साठवणे रा राजुरा, अमोल अर्जुन वाघमारे रा बामनवाडा ता राजुरा, अनिल जीवन सिग रा राजुरा, रामसिंग निषाद रा बामणी, प्रकाश तायडे रा राजुरा, सचिन भाऊराव लडके रा जवाहरनगर राजुरा, दिपक धर्मरक्षक फुले रा रमानगर राजुरा हे आठ व्यक्ती जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

प्राप्त माहितीनुसार ठाणेदार विशाल नागरगोजे, परिविक्षाधीन उपअधीक्षक व डी. बी. पथक प्रमुख जोशी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात पो उ नि चव्हाण ह्यांच्या सह राजुरा पोलिसांच्या चमूने दिनांक 30 जुन रोजी रात्री 8:30 – 9:30 वाजताच्या दरम्यान नियोजनबध्द धाड घालुन रेल्वे लाईन जवळ सर्व आरोपी गोलाकार बसुन 52 पत्यावर हारजीतची बाजी लाऊन जुगार खेळत असताना आढळून आले. पत्त्यांच्या डावावर लावलेले व आरोपींच्या अंगझडतीमधे पोलिसांना एकूण रु. 50,000/- रोख आढळून आले त्याचप्रमाणे आरोपींनी जुगार खेळण्यासाठी निर्जन स्थळी जाण्यासाठी वापरलेल्या तिन मोटर सायकल किंमत अंदाजे रु. 150,000/- असा एकूण 200000/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्व आठही आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 अ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये