ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न झाला, चंद्रपूर जिल्ह्यातील तीन तालुके हे निजामाच्या काळात नांदेड जिल्ह्यात येत असल्यामुळे चंद्रपुरातील पंधरा तालुक्यांपैकी फक्त तीन तालुक्यांमध्ये व तेलंगणा राज्यातील आदिलाबाद या जिल्ह्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो कारण हा तत्कालीन मराठवाड्याचा भाग मानला जातो.

या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त माजी सैनिक सन्माननीय श्री मारुती बोबडे व गजानन साळवे( कारगिल युद्धातील यौद्धे) हे विशेष करून उपस्थित असल्यामुळे त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे संपन्न झाला. यावेळी गावकरी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये