गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खुनातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

मृतकाच्या परिवाराला मिळाला न्याय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :-तीन वर्षा अगोदर वस्ती विभाग सातनल चौक येथे दि 20/5/21 रोजी डुक्कर चोरीचा कारणावरून मृतक राकेश दर्शन बहुरियाचा गळा कापून हत्या केली होती. तीन वर्षा नंतर कोर्टाने तिन्ही आरोपीना सजा सुनावली आहे.

दर्शन अर्जुन बहुरिया (68)यांचा मुलगा मृतक राकेश दर्शन बहुरिया याला 20/5/2021 रोजी डुक्कर चोरीचा कारणावरून मोटारसायकलने जात असतांना मृतकचा डोळ्यात मिरची पावडर टाकून लोखंडी भाला, तलवारने मारहाण करून गळा कापून खून केला होता. त्यावरून पो.स्टे. बल्लारपूर मध्ये कलम 302आर्म अक्ट 4/25 गुन्हा नोंद झाला होता.

त्यावरून पोलीस निरीक्षक (ठाणेदार)उमेश पाटील यांचा मार्गदर्शन खाली सदर गुन्हाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, पो.ह.बाबा नैताम आणि गुन्हे शाखाचा पथकाचे मदतीने अथक प्रयास करून आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र सादर करण्यात आले.

सदर आरोपी गुन्हाचे प्रकरण सेशन कोर्ट मा. न्या. पी. जी. भोसले साहेब यांचा कोर्टात सुनावणी झाली त्यात  न्यायाधीश यांनी यातील आरोपी राजकुमार राजू बहुरिया (21)सुरज राजू बहुरिया (26)या दोन आरोपीना जन्मठेप (आजीवन कारावास)व हजार रुपये दंड महिला आरोपी रूपा राजू बहुरिया हिला सहा महिने सक्त मजुरी व पाचशे रुपये दंड सजा दि. 4/3/2024 रोजी. सुनाविण्यात आली. सरकारी पक्षाचा वतीने सरकारी वकील मा. असिफ शेख यांनी व पोलीस निरीक्षक असिफराजा शेख यांचा मार्गदर्शनातं कोर्ट पैरवी भगवान मेश्राम महिला पोलीस हवालदार अनिता मोहुर्ले यांनी काम पाहिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये