ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्यासोबात मानसिक आरोग्यपण आवश्यक – डॉ. शारदा येरमे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्याकडे सगळेच पालक लक्ष देतात. मात्र, त्यांच्या मानसिक आरोग्याकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते.विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यही महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन डॉ. शारदा येरमे मॅडम यांनी केले. त्या प्रेरणा प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर येथे शारीरिक व मानसिक आरोग्य पर मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा.नानेश्वर धोटे सर,प्रमुख मार्गदर्शिका डॉ.शारदा येरमे मॅडम,प्रमुख अतिथी,मा. अरविंद मुसने सर, प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक अजय आस्कर सर, प्रा.राहुल ठोंबरे,प्रा.इजाज शेख प्रा.मनीषा मरसकोल्हे,प्रा. सचिन पवार हे मंचावर उपस्थित होते.

डॉ.शारदा येरमे मॅडम यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.पुढे मार्गदर्शन करताना येरमे मॅडम यांनी दैनंदिन जीवनातील विविध घटक मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. ज्या घरात सततची भांडण, आरडाओरड, नातेसंबंधात कटूता आढळते अशा मुलांना  चिंता, नैराश्य, वर्तणुकीशी संबंधित समस्या आणि नैराश्याचा सामना करावा लागतो. घरच्यांकडून शैक्षणिक अपेक्षांच्या ओझ्यामुळे चिंता आणि तणावाची भावना निर्माण होऊ शकते. असे मत व्यक्त केले.

तर मुख्यध्यापाक अजय आस्कर सर यांनी सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानामुळे विविध आव्हानांना सामोरे जावे लागत आहे, ज्यामुळे मुलांमध्ये सायबर क्राईम आणि नकारात्मकता सारख्या समस्यांचे प्रमाण वाढले. दिवसेंदिवस स्क्रीन टाइम वाढत असून मैदानी खेळांपासून तसेच शारीरीक हलचालींपासून मुलं दूर राहत असल्याची बाब समोर येत आहे.असे मनोगत व्यक्त केले.अध्यक्ष भाषणातून प्राचार्य नानेश्वर धोटे सर यांनी पालकांनी मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. चिडचिड, सामाजिक सहभाग कमी होणे किंवा मूड स्विंग्ज सारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये,अशा प्रकारची लक्षणे आपल्या मुलाला मानसिक आधाराची गरज असल्याचे सूचित करतात.शैक्षणिक गुणवत्तेत होणारी घट किंवा त्यांनी एकदा उपभोगलेल्या क्रियांमधील रस कमी होणे हे देखील धोक्याचे संकेत देत असल्याचे त्यांनी सांगितले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहा लांडे हिने तर सूत्रसंचालन रुपाली टेकाम व आभार मयुरी कोल्हे हिने मानले. कार्यक्रमाला विध्यार्थ्यांची लक्षनीय उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये