ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अभिष्टचिंतन दिनी संदीप पुण्यपकार यांनी दिले मानवतेचे दर्शन

रुग्णांना फळ व वाचनालयात पुस्तके वाटून साजरा केला वाढदिवस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

नगरपंचायत कार्यालय सावलीचे उपनगराध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सहसचिव आयु.संदीपभाऊ पुण्यापकार यांनी आपल्या वाढविसानिमित्य मानवतेचे दर्शन दिले आहे, राज्याचे विरोधी पक्षनेते,आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी जपलेले जनसेवा हिच ईश्वर सेवा यांचे व्रत जोपासले आहे त्यांचे आदर्श घेत संदीप पुण्यपकर यांनी वाढदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालय सावली येथील रुग्णांना फळ वाटप व सावली शहरातील जे गरीब व हुशार विदयार्थी वाचनालयात अभ्यास करतात अश्या महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय,महर्षी वाल्मिकी अभ्यासिका, जय भिम वाचनालय सावली व सुभेदार रामजी आंबेडकर सार्वजनिक वाचनालय सावली यांना पुस्तके देण्यात आली.

मागील वाढदिवसाला त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेश व साहित्य वाटप केले होते दरवर्षी त्यांची ही जनसेवा ही अविरत समाजसेवेसाठी समर्पित असल्याचे दिसून येते फळ वाटप व पुस्तके वाटप करण्याचे नियोजन संदीपभाऊ पुण्यपकार मित्रपरीवार सावलीतर्फे आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी सावली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार,युवा शहर अध्यक्ष अमर कोणपत्तीवार,आरोग्य स्वच्छता व पाणी पुरवठा सभापती प्रितम गेडाम,बांधकाम सभापती प्रियंका रामटेके,महिला व बालकल्याण सभापती सीमा संतोषवार,जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ता प्रशांत राईंचवार,माजी उपनगराध्यक्ष भोगेश्वर मोहुर्ले,नगरसेवक प्रफुल वाळके,नितेश रस्से,गुणवंत सुरमवार,अंतबोध बोरकर,नगरसेविका अंजली देवगडे,ज्योती शिंदे,ज्योती गेडाम,राधाताई ताटकोंडावार, उसेगावचे उपसरपंच सुनील पाल,माजी नगरसेविका संगीता गेडाम,युवा काँग्रेस पदाधिकारी मा.पंकज सुरमवार,निखिल दुधे,आकाश खोब्रागडे,राजू बुरीवार,मा.विक्की येनगटीवार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम,अमोल तिगलवार, मा.मृणाल गोलकोंडावार,मयूर दुधे,रोहित गेडाम,धम्मदीप बोरकर,साहिल वासाटे आदि उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये