Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडुन 1 देशी कटटा व 5 जीवंत काडतुस जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

स्थानिक गुन्हे शाखेने तत्परतेने कारवाई करून भर दिवसा कमरेला देशी बनावटीचे पिस्तुल अडकवून फिरणाऱ्या 20 वर्षीय जुबेर साहेबअली शेख, रा. लालपेठ कॉलरी नं. 01, चंद्रपुर नामक गुन्हेगाराला शिताफीने अटक केली असुन संबंधित आरोपीवर ह्यापूर्वीही काही गुन्हांची नोंद असल्याचे पोलिसांना आढळले आहे.

सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनंबधु यांनी जिल्ह्यातील पोलीस दलास चंद्रपूर जिल्हयामध्ये होत असलेले अवैध धंदे, अवैध हत्यार बाळगणाणे, शस्त्रांचा अवैध पुरवठा करणे इत्यादी प्रकारच्या गुन्ह्यांचा शोध घेऊन अशा समाजकंटकांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचा नेतृत्वात पथक तयार करून अवैध शस्त्र बलागणाऱ्यांची माहीती काढुन त्यावर कार्यवाही करण्याची मोहीम राबविणे सुरू होते. ह्या दरम्यान तुकुम तलाव, चंद्रपुर येथील के.जि.एन पान सेंटर जवळ एक इसम कमरेला देशी बनावटीचे रिवॉल्वर लावुन उभा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ कारवाई करीत सदर इसमास ताब्यात घेवुन त्याची तपासणी केली असता सदर ईसमाच्या कमरेला अडकवलेल्या काळ्या बॅग मध्ये एक गावठी बनावटीचे रिवॉल्वर व त्यात वापरण्यात येणारे 05 नंग जिवंत काडतुस आढळून आले.

आरोपी जुबेर साहेबअली शेख विरूध्द पोस्टे रामनगर येथे कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपीला पुढिल कायदेशीर कार्यवाही करिता पोस्टे रामनगर यांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शखा चंद्रपूर, यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल एकरे, पोउपनि विनोद मुरले. पो.हवा. संजय आतकुलवार, नापोअ संतोष येलपुलवार, पो.अ. गोपाल आतकुलवार यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये