ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांचे ध्येय मोठे असावे – ठाणेदार राजगुरु

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली येथील विमलताई महिला महाविद्यालयात तीन दिवशीय क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडले. समारोपीय कार्यक्रमाचे उद्रघाटक ठाणेदार राजगुरु होते विद्यार्थ्यांनी आपले ध्येय मोठे ठेवावे जेणेकरुन पुढील शिक्षणात कोणतीही अडचण येणार नाही. मोठे अधिकारी होता येणार असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी मंचावर संस्थेचे संचालक फुलझेले, विलास यासलवार माजी नगराध्यक्ष शेतकरी राईस मिलचे अध्यक्ष मोहन गाडेवार, माजी नगरसेवक छत्रपती गेडाम, नगरसेवक प्रितम गेडाम, नगरसेवक निलम सुरमवार, रोशन बोरकर, नितेश रस्से, प्राचार्य पठाण आदि मान्यवर उपस्थित होते.

सावली येथे मागील अनेक वर्षापासुन विमलताई महिला महाविद्यालयात ग्रामिण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयात तीन दिवशीय क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये दि. १८रोजी विद्यार्थीनीची कबड्डी, खो-खो, गोळाफेक आदी क्रिडा घेण्यात आल्या. तर दि. १९ आणि २०रोजी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यात विद्यार्थीनीनी उत्सफुर्त प्रतिसाद नोंदविला.

संचालन राजु दुर्गे, आभार प्रदर्शन प्राचार्य पठाण यांनी मानलेत कार्यक्रमाचे यशस्वतीतेसाठी संस्थेचे संचालक यशपाल गोंगले, प्राचार्य पठाण डॉ.खोब्रागडे नरेंद्र मोटघरे,दुर्वेश पीसे,नंदू ननावरे,रोहित मेश्राम,सरोज रायपूरे,अमित मेश्राम,आनंद तळसे,अक्षय गेडाम कमलकर ठाकूर,राकेश पातले यांनी कर्यक्रम यशस्वी करिता प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये