Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

म्हाडा कॉलनी सेवाग्राम रोड येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव संपन्न!

जाणताराजा शिवरायांनी बहुजनांना स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली - महेंद्र मुनेश्वर 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

म्हाडा कॉलनी सेवाग्राम रोड एमआयडीसी,वार्ड क्रमांक ४, बरबडी येथे सर्वधर्म समभावातून धर्मनिरपेक्षपणे समस्त नागरिकांनी,जाणताराजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी पहिल्यांदा केली आहे.

आजचा १९ फेब्रुवारी २०२४ हा दिवस म्हाडा कॉलनी नागरिकांसाठी सुवर्ण अक्षरांनी नोंदवणारा व मोठ्या अभिमानाचा आहे.यावेळी येथिल समस्त नागरिकांनी युगप्रवर्तक,स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना विनम्र अभिवादन केले.जाणताराजा शिवरायांनी बहुजनांना स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली.

असे रिपाइं नेते तथा एम आय डी सी,म्हाडा कॉलनी,बरबडी चे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मुनेश्वर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमा प्रसंगी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हाडा कॉलनी सेवाग्राम रोड येथिल समस्त नागरिकां तर्फे उत्साहात साजरी व्हावी अशी संकल्पना सामाजिक कार्यकर्ते व कार्यक्रमाचे आयोजक प्रभाकर पाटील यांनी व्यक्त केली.छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतांना, म्हाडा कॉलनी येथिल पुरुष व महिला भगिनी यांनी यावेळी आप – आपल्या घरा समोरील परिसर स्वच्छ केला.सकाळी ७.०० वाजता सर्वांनी घरासमोर रांगोळी काढल्या.सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुजन – अभिवादन व अल्पपोहार कार्यक्रम घेण्यात आला.ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मूनेश्वर आणि ज्येष्ठ नागरिक राजेंद्र भोयर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन म्हाडा कॉलनी चौकाचे छत्रपती चौक असे फलक लाऊन नामकरण करण्यात आले.

म्हाडा कॉलनी येथिल सामाजिक कार्यकर्ते रवींद्र विंचूळकर,सतिष इंगळे,निरंजन आत्राम,प्रफुल चावरे,संजय देशमुख,बाबारावं वानखेडे,शुभम नांदुरकर,गणेश चौधरी,किशोर मलातपुरे,विठ्ठलरावं सातघरे,अक्षय देवरे,रवींद्र ढगे,सुभाष खुजणारे, समिर सय्यद,गोलु सय्यद,प्रज्वल खुजणारे,प्रवीण खेकरे,राहुल पुनसे,विशाल पाटील,राजेंद्र वाघमारे,रक्षित आश्वघोष,राजू गुगनाके,शालिक नागदेवते, अरुण मोरस्कर, मुरारकर,पवण गोसेवाडे,सुनिल ढोले, बाबाराव कुत्तरमारे,आदी म्हाडा कॉलनी मित्र्मंडलाची प्रमुख उपस्थिती होती.या सर्वांनी शिव जयंती कार्यक्रम व्यसस्वी करण्यासाठी अथक परिश्रम केले.या सर्वांचे आभार कार्यक्रमाचे आयोजक प्रभाकर पाटील यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये