ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना येथे युवा प्रतिष्ठानच्या विद्यमाने शिवजयंती उत्सव थाटात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना : छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त कोरपना येथे युवा प्रतिष्ठान द्वारा भव्य दिव्य शिव जयंती साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे या सोहळ्यात भारतातिल संस्कृती चे वेगवेगळे कार्यक्रम दाखविन्यात आले.काशीविश्व्नाथ वाराणसी येथील गंगा नदीच्या किनारी होणारी सुप्रसिद्ध गंगाआरती, उजैन येथील सुप्रसिद्ध डंबरु वादक ग्रुप, हरिद्वार येथील भोले अघोरीं स्म्शान महाकाल ग्रुप,वाराणसी येथील शंखनाद ग्रुप,बीड येथील सुप्रसिद्ध हलगी वादक ग्रुप अश्या अनेक प्रकार चे कलाचे प्रदर्शन दाखविण्यात आले.

कोरपना येथील शिवजयंती चा कार्यक्रम पाहण्यासाठी शहरातील व शेजारी गावातील जनसैलाब उलटला होता.

शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन युवा प्रतिष्ठानचे नितीन बावणे यांनी केले.नेहमीच सहकार्याच्या हात पुढे करणारे नितीन बावणे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचा एक वेगळा ढसा शिवजयंतीच्या निमित्ताने कोरपना वासीयांना दाखवून दिला.आपल्या विकासात्मक कार्यातून त्यांनी सिद्ध केले की, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सिध्द आहोत.जनतेच्या विकासाला चालना देणाऱ्या योजना गतिमान करण्याचे काम करण्याचे त्यांनी प्रास्ताविकातून बोलून दाखविले.शहराचा चेहरामोहरा विकासाच्या दृष्टीने झपाट्याने बदलला जात असल्याचे त्यांनी सांगितले.जनतेच्या आरोग्याच्या बिकट परिस्थितीत आणि अन्य समस्येसाठी युवा प्रतिष्ठान जनतेच्या सुख दुःखात हाकेला ओ देण्याचे काम करेल असे नितीन बावणे म्हणाले.जनतेचे वेळोवेळी सहकार्य मिळत असल्यामुळेच कार्य करण्याची जिद्द निर्माण होत असते,नवीन ऊर्जा निर्माण होत असते,त्यामुळे जनतेने नेहमीच आपला आशीर्वाद असू द्यावा अशी साद प्रास्ताविकेतून नितीन बावणे यांनी कोरपना वाशीय जनतेला घातली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री विजयराव बावणे यांनी विचार व्यक्त केलेत. नगर पंचायत चे मुख्याधिकारी धुमाळ साहेब यांनी शहरातील विकास बद्दल मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री उत्तमराव पेचे,उदघाट्न प्रसिद्ध व्यक्ते श्री गणेश जी शिंदे, प्रमुख अतिथी नगराध्यक्ष नंदाताई बावणे,बाजार समिती कोरपना चे सभापती अशोकराव बावणे, प.स.मा.श्यामबाबू रणदिवे, सुरेश पा.मालेकर,संभाजी कोवे ,डॉ. प्रकाश खनके,उपनगराध्यक्ष इस्माईल भाई ,बाजार समिती चे संचालक गणेश जी गोडे, पुंडलिक गिरसावले इरफान भाई, बाळू बोडखे अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ईश्वर खनके,सचिन मोहितकर पंकज बावणे व युवा प्रतिष्ठान ची संपूर्ण टीम ने यशवीरित्या कार्य केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मालेकर यांनी केले तर आभार इस्माईल शेख यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये