ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शिष्यवृत्ती परिक्षेत कु. पायल मडावीची निवड
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आली. या परीक्षेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आंबेझरी येथील कु. पायल रमेश मडावी या विद्यार्थीनिंची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.
तीने आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक बंडू राठोड, वर्ग शिक्षक नागनाथ बोरुळे, मिलिंद मुसळे, पायल शिंदे, वैशाली गोडवे, जागृती उपरे,आपले आईवडील व वर्ग मित्रांना दिले आहे. शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्याने तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.