Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशी-विदेशी दारू व स्विफ्ट कारसह एकुण 7 लाख 38 हजारावर दारूसाठा जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविस्तर याप्रमाणे आहे की, दिनांक 09.02.2024 रोजी अक्षय पोहाणे रा. धोत्रा (का.) हा त्याचे चारचाकी वाहनाने अवैध्यरित्या देशी-विदेशी दारूचा माल भरून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्हयात वाहतुक करीत असल्याबाबत मुखबिरकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने पो.स्टे. अल्लीपुर हददीतील मौजा सोनेगाव स्टेशन शिवारात धोत्रा ते येसंबा रोडवर सापळा रचुन नाकेबंदी केली असता मिळालेल्या माहिती प्रमाणे एक पांढरया रंगाची स्विफ्ट कार कमांक MH-04-FZ-6916 हि चारचाकी कार येताना दिसली सदर कारला थाबंण्याचा इशारा दिला असतां पोलीसाची चाहुल लागल्याने सदर कार चालकाने त्याचे ताब्यातील वाहन जागीच सोडुन शेत शिवाराचा फायदा घेत पळुन गेला पळुन गेलेला इसम हा अक्षय पोहाणे रा. धोत्रा का. हाच असल्याची पंचाची व आमची खात्री झाली सदर आरोपीचा शोध घेतला असता मिळुन आला नाही.

मौक्यावर सदर कारची पाहणी केली असता सदर कारमध्ये मागील सिटवर व कारचे डिक्कीमध्ये खडर्याच्या खोक्यात व प्लॅस्टीक चुगंडीमध्ये देशी-विदेशी दारूच्या 1) दोन खडर्याच्या खोक्यात गोवा संत्रा कपंनीच्या 180 एमएल च्या 96 सिलबंद शिश्या, 2) सहा खडर्याच्या खोक्यात देशी दारू प्रिमीयम सुपर डिलक्स कपंनीच्या 90 एम.एल.च्या 600 शिश्या, 3) एका चुगंडीमध्ये देशी दारूच्या प्रिमीयम सुपर डिलक्स कपंनीच्या 180 एम.एल.च्या 70 सिलबंद शिश्या, 4) एका खडर्याच्या खोक्यात ऑफीसर चॉईस ब्लु कपंनीच्या 180 एम.एल.च्या 48 सिलबंद शिश्या,5) एका खडर्याच्या खोक्यात इम्पीरीयल ब्लु कपंनीच्या 180 एम.एल.च्या 48 सिलबंद शिश्या तसेच एका खडर्याच्या खोक्यात रॉयल स्टॅग कपंनीच्या 375 एम.एल.च्या 24 सिलबंद शिश्या असा जु.कि. 1,38,700/- रु.चा दारूमाल कारसह 7,38,700/- रू.चा मुददेमाल मिळुन आल्याने फरार आरोपी अक्षय पोहाणे, रा. धोत्रा (का.) यांचेविरूध्द पो.स्टे. अल्लीपुर येथे अप.क. 74/24 कलम 65 (अ) (ई),77 (अ) म.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरूल हसन, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्री. सागर कवडे, पोलीस निरीक्षक श्री. संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे निर्देशानुसार स.पो.नि. प्रफुल डाहुले, ठाणेदार पो.स्टे. अल्लीपुर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोलीस अमलदार मनोज धात्रक, अरविंद येणुरकर, संजय बोगा, अनुप कावळे, विनोद कापसे, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा तसेच प्रफुल चंदनखेडे पो.स्टे. अल्लीपुर यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये