ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वृंदावन नगर येथे माता रमाई, सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ यांची संयुक्त जयंती साजरी

यावेळी पंचशिल बौध्द मंडळाचे अध्यक्षसह ई. उपस्थित होते

चांदा ब्लास्ट

शहराच्या जवळच असलेल्या वृंदावन नगर येथे माता रमाई, सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. रमाई महीला मंडळाच्या वतीने पंचशिल बुध्द विहार वृंदावन नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय रेखाताई कुकडे तसेच प्रमुख वक्ता म्हणुन आदरणीय केंद्रीय शिक्षीका प्रगतीताई मेश्राम, आदरणीय सुजाताताई लाटकर भारतीय बौध्द महासभा चंद्रपूर, आदरणीय शिक्षीका मेधाताई जांभुळकर, शिलाताई रामटेके, माजी नगरसेविका शिलाताई चव्हाण उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता प्रगतीताई मेश्राम यांचे खुप छान मार्गदर्शन मिळाले तसेच सुजाताताई लाटकर यांचे प्रभावी वक्तृत्व आणि दमदार भाषण शैली यामुळे सर्वांचे मन जिंकुन घेतले. कार्यक्रमाची सुरुवात वंदन गीताने झाली. वंदन गीत बबीताताई देवगडे यांनी सादर केले. रमाई वेशभुषामध्ये कल्पनाताई खोब्रागडे, जिजाऊ वेशभुषामध्ये योगीताताई उके, सावित्रीबाई यांच्या वेशभुषामध्ये जयश्री वैद्य अशा प्रकारे वेशभुषामध्ये आलेल्या महीलांचे टाळयांनी स्वागत करण्यात आले.

रमाईचे मनोगत आरोही रामटेके ताई यांनी खुप सुंदर रित्या सादर केलें. यावेळी रमाई महीला मंडळ सदस्या कविताताई तोतडे, माहुलीकर ताई, शामलाताई खोब्रागडे, सुजाता वागदे, अनुश्री साव, देवांगणा कांबळे, सारीकाताई मेश्राम, लताताई रायपुरे आणि म्हस्के ताई, मेंढे ताई तसेच शारदा महीला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.

रमाई जयंती दिनी जिजाऊ महीला बचत गटाच्या वतीने एक दरी देण्यांत आली. छोटया बालकांनी गीतगायन केले. यावेळी पंचशिल बौध्द मंडळाचे अध्यक्ष रणजित जांभुळकर, कार्याध्यक्ष अरुण खोब्रागडे, सचिव सुनिल माहुलकर, कोषाध्यक्ष बंडू पाटील, सल्लागार मारोती साव, यशवंत उके ईत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मंजुश्रीताई पाटील, आभार प्रदर्शन हर्षाली चहांदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता रमाई मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये