ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोमय्या पॉलीटेक्नीकच्या विद्यार्थिनीचा ऍथलेर्टिक स्पर्धेत घवघवीत यश

सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थांचे अभिनंदन केले

चांदा ब्लास्ट

         महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व IEDSSA अंतर्गत नागपूर विभागीय मुलीचे ऍथलेर्टिक स्पर्धा दिनांक 0७/०२/२०२४ रोजी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेक्नीक, बेटाळा,बम्हपुरी येथे आयोजित करण्यात आले होते.

     या स्पर्धेत चंद्रपूर,नागपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली या जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय पॉलीटेक्नीक व फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला होता.

              तसेच यास्पर्धेत १०० मीटर,२००मीटर, ४०० मीटर रनिंग,उंच उडी,लांब उडी ,भाला फेक ,गोळा फेक व थाळी फेक,आदी स्पर्धेचा समावेश होता.

           या स्पर्धेत भाला फेक आणि उंच उडी स्पर्धेत सोमय्या पॉलीटेक्नीकच्या विद्यार्थिनी लक्ष्मी भोयर मायनिंग प्रथम वर्षातील हिने दुसरा क्रमांक प्राप्त केला.

       तसेच १०० मीटर रनिंग स्पर्धेत गुंजन कांबळे,२०० मीटर रनिंग स्पर्धेत निशा नखाडे,थाळी फेक स्पर्धेत दिशा गेडाम व गोळा फेक स्पर्धेत चेतना गोहणे या विद्यार्थिनीने तिसरा क्रमांक प्राप्त केला.

                  विद्यार्थीनीच्या यशाबद्धल संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख, उपप्राचार्य श्री. दीपक मस्के, प्रा. अनिल खुजे,रजिस्टार श्री. राजेश बिसन यांनी हार्दिक अभिनंदन केले.

      टीम मॅनेजर क्रीडा प्रमुख प्रा.कमलेश ठाकरे,प्रा.तृप्ती एकरे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थांचे अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये