ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातील शुभम नागपुरे क्रिकेट खेळाडूची उंच भरारी

आंतर विद्यापीठ वेस्ट झोन क्रिकेट (आँल इंडिया कलर कोट) संघाकरिता झाली निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

         स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती येथील खेळाडू शुभम राजेश नागपुरे (बी.एस्स.सी. भाग-२) या विद्यार्थ्यांची आंतर विद्यापीठ वेस्ट झोन क्रिकेट ( मुले ) खेळाकरिता नुकत्याच पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत क्रिकेट स्पर्धेत आँल इंडिया कलर कोट करिता निवड झाली.

               १८ ते २६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान कवियत्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आंतर विद्यापीठ वेस्ट झोन स्पर्धेत प्रतिनिधित्व करीत आहेत. या विद्यार्थ्याने आपले यशाचे श्रेय शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. विशाल शिंदे, सहसचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती यांना दिले आहे. व खेळाडूचा महाविद्यालयाच्या वतीने नुकताच गौरव भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला असून यावेळी भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती चे सचिव प्रा. डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव प्राध्यापक डॉक्टर विशाल शिंदे, प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, प्रा. डॉ. नरेंद्र हरणे, प्रा. डॉ. शशिकांत सीत्रे, प्रा. संदीप प्रधान, प्रा. कुंदन सहारे, प्रा. डॉ. अजय दहेगावकर, प्रा. डॉ. गजेंद्र बेदरे, श्री. अजय आसुटकर, श्री. अजीज शेख, श्री. विशाल गौरकार, श्री. पांडुरंग आखतकर, श्री. प्रमोद तेलंग, श्री. बंडू पेंदोर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्वांनी शुभम नागपुरेला पुढील वाटचाली करिता सुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये