ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर संपन्न

गोंडवाना विद्यापीठ संलग्नित व विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा द्वारा संचालित विवेकानंद महाविद्यालयाचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नित व विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट),वरोरा द्वारा संचालित स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ या संकल्पनेवर आधारित ‘विद्यापीठ आपल्या गावात’ राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे आयोजन दि. 18 जानेवारी, 2024 ते दि. 24 जानेवारी, 2024 या कालावधीत भद्रावती तालुक्यातील मुधोली या गावात करण्यात आले होते.

          शिबिराचे उद्घाटन दि. 19 जानेवारी, 2024 ला दुपारी 03.00 वाजता पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी.उमाटे, विधान परिषदेचे आमदार मा. सुधाकर अडबाले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष मा. रवींद्र शिंदे, चंद्रपूरचे माजी सभापती मा. तुळशीराम श्रीरामे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी मा. सुधाकर अडबाले यांनी गरिबीतून माणूस घडतो. जे तरुण उद्योगशील असतात. तेच प्रगती करतात असा संदेश दिला. मा. रवींद्र शिंदे यांनी गुरूशिवाय मार्ग नाही. जीवनामध्ये गुरूचे महत्त्व विशद केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाटे सरांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगितले.

       दि. 20 जानेवारी, 2024 ला सकाळी ठीक 9.00 वाजता गावातील नागरिकांसाठी आरोग्य विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश मेश्राम यांनी 68 रोग्यावर मोफत तपासणी करून औषधोपचार केला. दुपारच्या बौद्धिक कार्यक्रमात मा. सुषमाताई शिंदे यांनी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात ‘ग्राहक संरक्षण कायदा – 2019’ या विषयावर अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूरचे पदाधिकारी मा. पुरुषोत्तम मत्ते, मा. वसंत वऱ्हाटे, मा. वामन नामपल्लीवार, पत्रकार मा. प्रवीण चिमूरकर यांनी सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन केले.

          दि. 21 जानेवारी, 2024 ला दुपारी 3.00 वाजता कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजरत्न पथाडे यांनी वाहतूक सुरक्षाविषयक, सचिव ॲड. प्राशिष ताठे, यांनी महिला विषयक समान हक्क, ॲड. सुनील नामोजवार यांनी महिलांना समाजात सन्मानाने जगण्याचा अधिकार, वन हक्क समितीचे मार्गदर्शक मा. शंकर बरडे यांनी वन्यजीव संरक्षण याविषयावर मार्गदर्शन केले.

          दि. 22 जानेवारी, 2024 ला ‘ग्रामीण विकासात युवकांचे योगदान’ या विषयावर डॉ. यशवंत घुमे, तर ‘मेरी माटी, मेरा देश’ या विषयावर डॉ. जयवंत काकडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच समस्त गावकरी, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने नागदिवाळी, राष्ट्र संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी मिरवणुकीत 30 गावातील भजन मंडळ मुधोली येथे उपस्थित झाले होते. लेझीम, राष्ट्र संत तुकडोजी महाराजांची विविध प्रकारचे भजन म्हणत पर्यावरण संरक्षण, वन्यजीव संरक्षण जनजागृती करीत दिंडी काढण्यात आली.

          दि. 23 जानेवारी, 2024 ला सकाळी ठीक 08.00 वाजता पशु चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मा. डॉ. दत्ता नन्नावरे यांनी 25 शेतकरी मालकांच्या 88 जनावरांवर मोफत औषधोपचार केला तसेच ताप व जंतूनाशक लसीकरण केले. जनावरांना चारा करण्यासाठी प्रोटीन पावडर दिला. दुपारच्या बौद्धिक सत्रात मतदार जागृती याविषयावर तहसीलदार मा. मलिक पठाण, रस्ता वाहतूक सुरक्षाविषयक याविषयावर पी.एस.आय. मा. सुधीर जाधव साहेब, वाहतूक शाखेचे पोलीस मा. चंदू ताजने यांनी वाहतूक सुरक्षा व कायदे, मा. सुमित चव्हाण साहेब, पोलिस काॅन्स्टेबल यांनी वाहतूक सुरक्षा व दक्षता विषयावर मार्गदर्शन केले.

        दि. 24 जानेवारी, 2024 ला सकाळी ठीक 10.00 वाजता समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी. उमाटे , चंद्रपूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मा. रणजीत यादव, तहसीलदार मा. अनिकेत सोनवणे, गटविकास अधिकारी मा. आशुतोष सपकाळ, चंद्रपूर जिल्हा समन्वयक, प्रा. डॉ. विजयाताई गेडाम, माजी सभापती, मा. तुळशीराम श्रीरामे, सरपंच, मा. बंडूजी नन्नावरे, मुख्याध्यापक मा. कैलास उरकुडे, पोलीस पाटील मा. सौ. सुनीताताई गराटे, मुख्याध्यापक मा. कैलास उरकुडे, ग्रामसेवक मा. विजय पचारे, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष मा. शंकर गायकवाड, वन हक्क समितीचे अध्यक्ष मा. श्रीकृष्ण दडमल, वन समितीचे अध्यक्ष मा. कार्तिक राणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. हनुमान राणे यांनी सहकार्य केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, समस्त गावकरी विवेकानंद महाविद्यालयाचा प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पोलिस पाटील, ग्रामसेवक, आशासेविका, अंगणवाडी सेविका, रासेयो स्वयंसेवक-स्वयंसेविका यांनी अथक परिश्रम घेतले. या सात दिवस चालणाऱ्या शिबिरामध्ये महिला सबलीकरण, पर्यावरण संरक्षण, वन्यजीव संरक्षण, वृक्षारोपण, स्वच्छता, आरोग्य, व्यसन मुक्ती, हुंडाबळी या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. उत्तम घोसरे यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. अमोल ठाकरे आभार प्रगटीकरण डॉ. रमेश पारेलवार यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये