ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रह्मपुरी शहरात रंगणार थरार नमो चषकाचा…

9 फेब्रुवारी रोजी सुरू होणाऱ्या "नमो चषक" स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे - माजी आमदार प्रा.अतुल देशकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “नमो चषक 2024” या स्पर्धेची ब्रह्मपुरी शहरात दि.9 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार असून विविध खेळांचा थरार प्रेक्षकांना प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे. या स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल स्पर्धा, दौड स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,मॅरेथॉन स्पर्धा या चारही स्पर्धा किती प्रभावीपणे आयोजित करता येईल,याबाबतची नियोजनात्मक बैठक नुकतीच शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे भाजपा शहराध्यक्ष इंजिनियर अरविंद नंदुरकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्राचार्य सुयोग बाळबुध्दे शहराध्यक्ष भाजयुमो ब्रह्मपुरी,प्रा.डॉ. अशोक सालोटकर शहराध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा ब्रह्मपुरी, पवन जयस्वाल सदस्य संजय गांधी निराधार योजना समिती ब्रम्हपूरी, रितेश दशमवार शहर उपाध्यक्ष भाजपा ब्रह्मपुरी, तनय देशकर जिल्हा सचिव भाजयुमो चंद्रपूर, साकेत भानारकर तालुका सह संयोजक “घर चलो अभियान” ब्रह्मपुरी, प्रा.राजू भागवत तालुका महामंत्री भाजपा ओबीसी मोर्चा ब्रह्मपुरी, प्रा.जुमडे सर शहर महामंत्री भाजपा ओबीसी मोर्चा, इ. शहर भाजपा प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.

         दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोज शुक्रवारला सकाळी 9 वा. पासून एक दिवसीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा प्रारंभ होईल. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार 15 हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय पुरस्कार 10 हजार रुपये व आकर्षक चषक, तृतीय पुरस्कार 7 हजार रुपये व आकर्षक चषक…..

याच दिवशी दुपारी 4 वा. 400 मीटर दौड स्पर्धा, ही फक्त पुरुष गटांसाठी असून या स्पर्धेचा प्रथम पुरस्कार 5 हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय पुरस्कार 3 हजार रुपये व आकर्षक चषक, तृतीय पुरस्कार 2 हजार रुपये व आकर्षक चषक.

           दि.10 फेब्रुवारी 2024 रोज शनिवारला “भव्य रांगोळी स्पर्धेचे” आयोजन केले असून या स्पर्धेचा विषय “स्वच्छ भारत, समृद्ध भारत” हा आहे. या स्पर्धेत 18 वर्षावरील स्त्री-पुरुषांनाच भाग घेता येईल. स्पर्धेची वेळ मर्यादा 90 मिनिटे राहील. रांगोळीचा आकार 4ft x 4ft राहिल.रांगोळी स्वतः स्पर्धकाला आणावी लागेल. या स्पर्धेचा प्रथम पुरस्कार 5हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय पुरस्कार 3 हजार रुपये व आकर्षक चषक,तृतीय पुरस्कार 2 हजार रुपये व आकर्षक चषक.

            दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोज रविवारला “भव्य मॅरेथॉन दौड” स्पर्धेचा प्रारंभ शिवाजी चौकापासून होणार असून पुरुषांसाठी सकाळी 7 वा.तर महिलांसाठी सकाळी 8 वा.चा वेळ राहील. 18 वर्षावरील स्पर्धकच स्पर्धेत भाग घेऊ शकतील.या स्पर्धेचे प्रथम पुरस्कार महिला आणि पुरुष गटांसाठी प्रत्येकी 11 हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय पुरस्कार 7 हजार रुपये व आकर्षक चषक, तृतीय पुरस्कार 5 हजार रुपये व आकर्षक चषक राहील. अशी माहिती भाजपा प्रवक्ता तथा प्रसिद्धीप्रमुख प्रा.संजय लांबे यांनी दिली असून ही स्पर्धा ग्रामीण आणि शहरी खेळाडूंसाठी नरेंद्र मोदींनी नमो चषकाची खास मेजवानी दिली आहे .ही स्पर्धा खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असून या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये