ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भारतीय स्टेट बँकेच्या रक्तदान शिबिरात 85 व्यक्तींनी केले रक्तदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
भारतीय स्टेट बँकेच्या दोन्हीं शाखेच्या वतीने स्टेट बँकेच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, या शिबिरात 85 रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात महत्वपूर्ण योगदान दिले.
रक्तदान शिबिराला आमदार मनोज कायंदे, माजी आमदार डॉ शशीकांत खेडेकर, यांच्या सह विविध मान्यवरांनी भेट दिली.
लिलावती ब्लड बँक, बुलढाणा यांच्या चमुनी रक्त संकलन करण्यासाठी योगदान दिले. या प्रसंगी शाखा व्यवस्थापक नागेश टेकाळे व अंकुश रोडे तसेच अधिकारी व कर्मचारी तसेच ग्राहक उपस्थित होते.
शाखा व्यवस्थापक नागेश टेकाळे व अंकुश रोडे यांनी सर्व रक्तदात्यांचे तसेच सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.