ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ,गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय, गडचांदूर येथे दि. 23 जानेवारीला थोर क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस तथा शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापकतथा प्राचार्य धर्मराज काळे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेण्याचे सांगितले. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस तथा बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनकार्याची माहिती सांगीतली. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार जेष्ठ शिक्षिका ज्योती चटप यांनी केले. कार्यक्रमासाठी  भुवनेश्वरी गोपमवार, सुषमा शेंडे, वासेकर नामदेव बावनकर, मांढरे, मरस्कोल्हे, आडे, कोंगरे, मेश्राम, लिलाधर मत्ते, शशीकांत चन्चे, संकल्प असारकर यांचे सह सर्व विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये