ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुधीरभाऊ सेवा केंद्रात भाजपाची बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- भारतीय जनता पार्टी तालुका जिवती व भारतीय जनता युवा मोर्चा तालुका जीवती ची तालुका बैठकीचे आयोजन सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र जिवती येथे करण्यात आले होते.

सदर बैठकीला तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बूथ प्रमुख,शक्ती केंद्रप्रमुख व भाजपचे तालुक्याचे पदाधिकारी महिला प्रतिनिधी सरपंच, उपसरपंच यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर बैठकीमध्ये नमो चषक संदर्भात तालुक्यामध्ये विविध माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करणे व हॉलीबॉल आणि चित्रकला या स्पर्धेचे आयोजन करणे यासंदर्भात सविस्तर चर्चा होऊन अनेक कामाचे वाटप समिती स्थापन केल्या गेल्या.

तसेच तालुक्यामध्ये मकरसंक्रातीच्या निमित्ताने महिलांचे खेळ आणि स्नेहमिलन कार्यक्रम घेण्यासंदर्भात यावर चर्चा झाली. तो मकरसंक्राती चा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा अशी चर्चा झाली.

त्याचबरोबर २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटनाप्रसंगी तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरी कमीत कमी पाच दिवे लावण्या संदर्भात भारतीय जनता पार्टी तालुका जिवती तर्फे आयोजन करून प्रत्येक गावामध्ये राम मंदिराचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा सण दिवाळी उत्साहासारखा साजरा झाला पाहिजे.यासाठी सुद्धा त्यामध्ये चर्चा होऊन तसे नियोजन केले.

त्याचबरोबर नव मतदाता हाच देशाचा भाग्यविधाता या कार्यक्रमाचे सुद्धा २५ जानेवारी रोजी थेट प्रक्षेपण देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे एका कार्यक्रमाद्वारे करणार आहेत.ते नविन मतदाराना व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचे पण नियोजन यामध्ये करण्यात आले.

अनेक कार्यक्रम नियोजन यावर सविस्तर चर्चा होऊन जिवती तालुक्यातील समोरून येणारे कार्यक्रम नियोजनबद्ध झाले पाहिजे यासाठी बैठक मध्ये सर्वानुमते चर्चा झाली.

सदर तालुक्याच्या बैठकीला भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हामहामंत्री तथा जिवती पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश देवकते, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष केशव पाटील गिरमाजी, तालुका महामंत्री सुरेश केंद्रे, तालुका महामंत्री दत्ताराठोड , प्रामुख्याने उपस्थित होते.

त्यासोबत गोपीनाथ चव्हाण,माधव कुरसंगे,प्रल्हाद मदने,मारुती बेल्हाळे,तुकाराम वारलवाड,माधव नीवळे, अंकुश येमले, राजेश हरी राठोड, आनंद कदम,नामदेव सलगर,संतोष जाधव,किशोर चांदोरे,तानाबाई मडावी,हिरावती धारुंडे,सत्तेशीला चव्हाण,अजय खंदारे,मुकुंद राठोड,पंढरी वाघमारे,मारुती भांनगिर,चंद्रकांत घोडके, शेख फरीद भाई, साहेबराव राठोड टीकाराम राठोड,संतोष आडे संदीप पवार, भारत चव्हाण, विष्णू बन्सी जाधव,गणेश मरके अंबादास कंचकटले,व्‍यंकटी हारगिले, बालाजी माने, बालाजी भुते आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये