ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पावना वन क्षेत्रात अवैधरित्या रेती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      वनपरिक्षेत्रातील पावना नियतक्षेत्रामधील अवैधरित्या वाळु (रेती) उत्खनन करून वाहतुक करीत असलेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्राधिकारी किरण धानकुटे यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहाय्यक व चमूने टाकलेल्या धाडीत १ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. सदरची कारवाई शनिवार दि.१२ एप्रिलला सकाळी ७ वाजता करण्यात आली.

 या कारवाईत पावना निवासी सागर तुकाराम तुमराम याच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक एमएच – ३४ – बिजी – २९९० व ट्रॉली क्रमांक एमएच – ३७ – यू -३४२ हे शासकीय वनातील राखीव वन कक्ष क्रमांक ९०९ नियतक्षेत्र पावना मधील नाल्यातुन अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतुक करीत असल्याचे दिसुन आले. असता ट्रक्टर वरील वाहन चालक यांना त्यांचेकडे रेती उत्खनन व वाहतुक परवानाबाबत कागदपत्र असल्यास दाखवण्यास सांगीतले असता. त्यांचेकडे कोणतेही कागदपत्र दिसुन आले नाही. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांनी ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली आणि वाहन मालकावर वन गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कार्यवाईत भद्रावती क्षेत्र सहाय्यक ए.बी.शेळकी, एम.आर.देठे वनरक्षक मासळ, डी. एम.गेडाम वनरक्षक भद्रावती, पवन मांढरे, नितिन राऊत,अनिल शेंद्रे, किशोर मडावी,अमर किन्नाके व अमरदिप कोल्हे यांनी मोहीम यशस्वी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये