ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रियदर्शी सम्राट अशोक अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       प्रियदर्शी सम्राट अशोक अभ्यासिका व वाचनालयाचे दिनांक १२ रोज सोमवारला ऐतिहासिक विजाशन बुद्ध लेणी भद्रावती येते उदघाटन झाले. तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानासाठी ते खुले करण्यात आले आहे.

महाविदर्भ भिक्यु संघ व वर्षावास आयोजन समिती यांनी लोकसहभागातून ही अभ्यासिका उभारली. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून महेंद्र गावंडे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष लिनता जुनघरे उपस्थित होत्या ऐतिहासिक विजासन बुद्ध लेनी हे विद्येचे आसन आहे येथे तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थी घडावा यासाठी लोकसभागातून भव्य अभ्यासिका उभारण्यात आल्याचे वर्षावास समिती अध्यक्ष लिहता जुनघरे म्हणाल्या.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुशील देवगडे, ऍड मिलिंद रायपुरे, ब्रह्मानंद अनंत, विवेक आकोचवार, राजेश वासाडे, सुरज गावंडे डॉ. अमित नगराळे आदी मंचावर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी या अभ्यासिकेला महत्त्वपूर्ण पुस्तके तसेच इतर साहित्य दान केले कार्य क्रमाचे सूत्रसंचालन जयदेव खाडे प्रास्ताविक विनयबोधी डोंगरे तर आभार कवडू कांबळे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये