ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आयटक जनजागरण महासंघर्ष यात्रेचा विराट बाईक रॅली व मोर्चा काढून चंद्रपूर येथे स्वागत!

कामगार कर्मचारी शेतकरी धोरण विरोधात १८ डिसेंबर नागपूर महामोर्चा सहभागी व्हा! - कॉ. श्याम काळे

चांदा ब्लास्ट

केन्द्र व राज्य शासनाच्या कामगार कर्मचारी,शेतकरी, जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ  २० नोव्हेंबर पासुन कोल्हापूर येथून आयटकची   राज्यव्यापी  महासंघर्ष  यात्रा सुरूवात झाली आहे. १४  डिसेंबर चंद्रपूर  येथे पोहचली .राष्ट्रपिता महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास  अभिवादन करून  डि नार.सी.हेल्थ क्लब संयुक्त खदान मजदुर संघ संलग्न आयटक कार्यालय येथून विराट बाईक रॅली काढून संपूर्ण शहर फिरत जिल्हा धीकारी कार्यालय परंत पोहचली तर योजना कर्मचाऱ्यांनी आयटकचे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात सकाळी १२ वाजता आझाद बगीचा ते जिल्हा धिकारी कार्यालय वर विराट मोर्चा काढून केंद्र व राज्य सरकार विरोधात तीव्र नारेबाजी करत धडक दिली त्या नंतर नियोजित जाहीर जाहीर सभेला सुरुवात करण्यात आली.
  सभेस जन जागरण यात्राचे नेतृत्व करणारे
आयटक राज्य सरचिटणीस कॉ. श्याम काळे, आयटक राज्य उपाध्यक्ष कॉ.प्रा.राम बाहेती,आयटक राज्य सचिव कॉ.राजू देसले, कॉ. सदाशिव निकम, आयटक चे राष्ट्रीय कौन्सिल सदक्ष कॉ. एन. टी.म्हस्के, कॉ.दिलीप बर्गी, कॉ.प्रकाश वानखेडे, कॉ.संजय नागापुरे,जिल्हा सचिव कॉ.विनोद झोडगे, कॉ.प्रकाश रेड्डी,रवींद्र उमाटे,माजी नगरसेवक तथा जिल्हा संघटक आयटक राजू गैनवार,मुरली चींतलवार,दीपक ढोक,दिलीप कनकुलीवार,प्रदीप चिताडे,जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे नेते दीपक देऊरकर, फर्जना शेख,निकीता निर,सविता गट लेवार,ललिता कोवे,शाहीर कॉ. धमा खडसे यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 आयटक राज्य उपाध्यक्ष कॉ.प्रा.राम बाहेती यांनी  केंद्र सरकार सर्वसामान्य जनता विरोधी धोरण राबवत आहे. कंत्राटी कर्मचारी, मानधनावर वरील आशा गट प्रवर्तक,शालेय पोषण आहार कर्मचारी,अंगणवाडी सेविका,मदतनीस कंत्राटी नर्सेस, अंशकालीन स्री परिचर  कोरोना  योद्धा ना किमान वेतन  दिले नाही. त्यांना कर्मचारी दर्जा द्या.  सर्व योजना कर्मचारी ना कायम करा यासाठी आयटक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
 कॉ. श्याम काळे राज्य आयटक सरचिटणीस  यांनी केंद्र व राज्य सरकारं कामगार कर्मचारी विरोधी धोरण राबवत आहे. त्यांचा २०२४ मध्ये पराभव करा. अन्यथा भारतीय लोकशाही संकटात येईल. सर्व कामगार संघटना, शेतकरी संघटना , सर्व सामान्य जनतेने एकत्र येऊन परिवर्तन केले पाहिजे. सत्ताधाऱ्यांना जाब विचारा दिलेले आश्वासन  पाळली नाही. त्यांचा पराभव करा.  येत्या १८ डिसेंबर रोजी यात्रा नागपुरात १लाख चा आयटक  चा भव्य मोर्चा विधान सभा वर आयोजित करण्यात आला आहे. त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.
 कॉ. राजू देसले  राज्य सचिव आयटक यानी यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. आशा गट प्रवर्तक संप काळातील मंजूर मागण्या चा शासन निर्णय त्वरित काढण्यात यावा यासाठी सहकुटंब मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन आशा गट प्रवर्तक राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी केले तसेच,कामगार कर्मचारी, पेन्शनर ईपीएस यांना केंद्र सरकारने फसवले आहे. सर्व आशा गट प्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी,अंशकालीन स्री परिचर, हात पंप दुरुस्ती देखभाल कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायात कर्मचारी, विज कर्मचारी, कोळसा खाण कामगार,विडी कामगार, कामगार, शेतकरी, बांधकाम कामगार, मोलकरीण ना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा लागू करा. त्या साठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. व भव्य मोर्चा १८ डिसेंबर रोजी आहे. त्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
 जाहीर सभेला हजारो संघटित व असंघटित योजना कामगार उपस्थित होते. संचालन कॉ.विनोद झोडगे तर आभार कॉ.राजू गैनवार यांनी मानले.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये