ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाजकार्य महाविद्यालयात पूर्वाभिमुख कार्यक्रम

एम. एस. डब्ल्यू व्दितीय वर्षाच्या वतीने आयोजन

चांदा ब्लास्ट

स्व. सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर येथील  एम.एस.डब्ल्यू व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या पूर्वाभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व विषयांची ओळख प्राध्यापकांनी करुन दिली.
प्रास्ताविक करताना वर्गप्रमुख प्रा. डॉ. ममता ठाकूरवार यांनी सांगितले की चौथ्या सेमीस्टर मध्ये संशोधन पुर्ण करावे लागते त्यासाठी त्यांना याविषयी कशा पद्धतीने तयारी करावी लागते याची माहिती दिली.  महाविद्यालयाच्या प्राचार्य (प्रभारी) डॉ. जयश्री कापसे म्हणाल्या, महाविद्यालयात नव नवी संकल्पना राबविण्याचा मानस आहे. या दृष्टीने विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण आवडीने शिकण्याची आवश्यकता आहे.  सकाळची प्रसन्न प्रार्थना सामाजिक कार्याची प्रेरणा देईल व विद्यार्थ्यानी संशोधन कसे लवकरात लवकर तयार करता येईल याविषयी महत्वाचे मार्गदर्शन केले. उपप्राचार्य प्रा. नरेंद्र टिकले म्हणाले, विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीने विद्यार्थांनी तयारी केली पाहिजे.
यावेळी प्रा. डॉ. देवेंद्र बोरकुटे सर उपस्थित होते. संचालन हर्षाली खारकर तर आभार महिमा मोहुर्ले हिने व्यक्त केले.
शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये