ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विमाशि संघाचे हिवाळी अधिवेशनादरम्यान धरणे आंदोलन

जुनी पेन्शन योजना लागू करा तसेच अन्य मागण्यांचा समावेश

चांदा ब्लास्ट

NPS रद्द करून सर्व राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा व अन्य मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवार, दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत यशवंत स्टेडीयम नागपूर येथे धरणे/ निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यातील खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थाअतर्गत संचालित प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा खाजगी अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शिक्षकांत तीव्र नाराजीची भावना लक्षात घेता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांच्या नेतृत्वात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, अध्यक्ष श्रावण बरडे यांच्या उपस्थितीत धरणे / निदर्शने आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
NPS रद्द करून सर्व कर्मचा-यांना जुनी पेंशन योजना लागू करा, दत्तक शाळा योजना राबविण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा, विद्यार्थी हितासाठी २० पटाखालील शाळा बंद होऊ नयेत, यासाठी समुह शाळा संकल्पना रद्द करणे, विना अनुदानित / अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित धोरणानुसार १०० टक्के अनुदान मंजूर करण्यात यावे, राज्यातील अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीव तुकडयांना अनुदानास पात्र घोषित करून आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी, राज्यातील रिक्त असलेली माध्यमिक / उच्च माध्यमिक शिक्षकांची पदे तात्काळ भरण्यात यावी, वरिष्ठ श्रेणी मंजूरीचे अधिकार पूर्वीप्रमाणे लेखाधिकारी (शिक्षण) यांना देण्यात यावे, सन २०२२-२३ च्या संच मान्यतेमधील अनियमितता तात्काळ दूर करण्यात यावी, विना अनुदानित / अंशतः अनुदानित शाळेत कार्यरत शिक्षक – विद्यार्थी संख्येअभावी अतिरीक्त झाल्यास त्यांच्या समायोजन संदर्भाने नियमावलीत दुरूस्ती करून त्यांचे समायोजन करण्यात यावे, अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या परंतू DCPS/NPS खाते नसलेल्या कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा नगदीने द्यावयाचा पहिला, दुसरा व तिसरा हप्ता तातडीने अदा करण्यात यावा, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा काही जिल्ह्यामध्ये (उदा. नागपूर / यवतमाळ व भंडारा तसेच इतरही अनेक जिल्हयात) प्रलंबित असलेला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हप्ता तातडीने अदा करण्यात यावा, समाजकल्याण व आदिवासी विभागात कार्यरत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा प्रलंबित पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्ता तात्काळ अदा करण्यात यावा व अन्य मागण्यांचा धरणे आंदोलनात समावेश आहे.
बुधवारी होणाऱ्या धरणे आंदोलनात विदर्भातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या प्रांतीय, जिल्हा, शहर पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये