ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिव्यांग वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, वरोरा, जि. चंद्रपूर द्वारा संचालित

चांदा ब्लास्ट
दिव्यांग बांधवांच्या सामाजिक पुनर्वसनाकरिता अनेक मान्यवर संस्था कार्यरत आहेत, परंतु दिव्यांग बांधवाच्या त्यांच्यातील क्षमता योग्यता व कमकुवतपणा लक्षात घेऊन योग्य जोडीदार निवडण्यात सहकार्य करून संपूर्ण आयुष्य समृद्ध करण्याकरिता आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, वरोरा, जि. चंद्रपूर द्वारा संचालित स्व. गौरवबाबू पुगलिया दिव्यांग उपवर वधु सुचक केंद्र वरोरा द्वारे मागील 20 वर्षापासून कार्यरत आहे. आजपर्यंत संस्थेने 400 पेक्षा जास्त जोडप्यांचे लग्न जोडून सामूहिक विवाह सोहळ्यात मोफत लग्न लावून यशस्वी संसार उभारण्यात संस्थेला यश प्राप्त झाले आहे.
मा. नरेंद्रकुमार शामबाबूजी पुगलिया यांचे तन-मन-धनाने आमच्या पाठीशी आशीर्वाद हेच या यशाचे गमक आहे. संस्थेच्या यशस्वी वाटचालीने समाजातील आमचे मित्र परिवार सुद्धा आता हिंमतीने समोर येत असून पहिल्यांदाच महाराष्ट्रातील अति दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील माता कन्याका परमेश्वरी देवस्थान येथे दि. 10/12/2023 रोज रविवारला सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत दिव्यांग (अंध, अस्थिव्यंग, कर्णबधिर) बांधवांच्या वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक अतिथी म्हणून  मा. धर्मरावबाबा आत्राम, कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य,  मा. श्रीमंत राजे अंम्बीशराव महाराज माजी राज्यमंत्रि (म.रा.),  श्रीमती. भाग्यश्रीताई हल्गेकर आत्राम माजी जि. प. अध्यक्ष गडचिरोली,  मा. निखिल धारमिक, प्रहार जिल्हा अध्यक्ष गडचिरोली, मा. अमोल मुक्कावार नगरसेवक अहेरी तसेच प्रमुख अतिथी म्हणून  मा. विजय भाकरे साहेब, अप्पर जिल्हाधिकारी अहेरी, मा. सुनील सौंदाणे साहेब, तहसीलदार अहेरी, मा. मनोज काळबांडे, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अहेरी,  मा. शैलेशभाऊ पटवर्धन नगरसेवक अहेरी,  मा. संतोष ताटीकोंडावार सामाजिक कार्यकर्ता हे उपस्थिती तथा मार्गदर्शन लाभनार आहे.
करिता संस्थेचे अध्यक्ष संजयकुमार पेचे व सचिव  महेश भगत यांनी सदर आयोजित मेळाव्यात दिव्यांग बांधवांनी संपूर्ण कागदपत्रासह निर्णय प्रक्रियेत सहकार्याकरीता पालकांनी आपल्या दिव्यांग पाल्यासह उपस्थित राहून विवाह जोडण्याच्या या सामाजिक कार्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये